Satara News : कास पठारावरील बांधकामांवरून सातारचे दोन्ही राजे आक्रमक, उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
Satara News : सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरातील (Kas Plateau) अनधिकृत बांधकामाबाबत एबीपी माझाने 'कास कोण करतंय भकास ?' अशी रोक ठोक भूमिका घेत वृत्त प्रसारीत करताच सातारचे दोन्ही राजे आक्रमक झाले आहेत.
सातारा : जागतिक वारसास्थळ म्हणून युनोस्कोने आपल्या पुस्तकात नोंद घेतलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरातील (Kas Plateau) अनधिकृत बांधकामाबाबत एबीपी माझाने 'कास कोण करतंय भकास ?' अशी रोक ठोक भूमिका घेत वृत्त प्रसारीत करताच सातारचे दोन्ही राजे आक्रमक झाले आहेत. मात्र, एक राजा हा कास परिसरातील अतिक्रमणे कायम करावी अशी मागणी करत असताना दुसरा राजा निसर्गाचा समतोल राखला जावा आणि अतिक्रमणे काढावी अशी भूमिका घेत आहेत. खा. उदयनराजे भोसले (Udayanraje) यांनी आज सकाळी सातारा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कास परिसरातील निसर्गाचा समतोल राखला पाहिजे यासाठी अनधिकृत बांधकामे काढली पाहिजेत अशी भूमिका घेतली. तर दुपारी आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje) यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ज्यांनी आपल्या स्व: च्या मालकीच्या जागेवर बांधकामे केली आहेत, त्यांची बांधकामे अधिकृत करा अशी मागणी करत आहेत. ही बांधकामे पाडण्याची भूमिका प्रशासनाने घेतली तर आम्हाला बायका पोरांसह रस्त्यावर झोपावे लागेल अशी भूमिका शिवेंद्रराजे यांनी घेतली आहे.
उदयनराजे यांची भूमिका
महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणचे एसएसआय वाढवून मिळावी अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. कास फिरायला आलेल्या पर्यटकांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी तसे नियोजन केले पाहेजे. जी बांधकामे झाली आहेत, त्यामुळे कासचा परिसरत विदृप होत चालला आहे. हा परिसर म्हणजे वेस्टन घाट, वल्ड हेरीटेज, इको सेन्सीटीव, सह्याद्री व्याग्र प्रकल्प आहे. या भागातील लोकांनी नेमक काय करायच? पर्यटन वाढले पाहिजे असं आपण म्हणतो त्यावेळी स्थानिकांचा विचार केला पाहिजे. त्यांनी नेमक खायचं काय यावरही चर्चा केली पाहिजे. 4 तारखेला जिल्हाधिकारी आणि मी कासची पहाणी करण्यासाठी जाणार आहे. लोणावळ्याला जात होतो तेंव्हा ते हिरवगार होते, आज तेथे झाडे नाहीत. कासची झाडी जपली पाहिजेत, पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजेत, या आगोदर पाचगणी महाबळेश्वर परिसरात जी बेकायदा बांधकामे झाली आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजेत. साखर कारखाने, एमायडीसी मधील कारखान्यांची तपासणी झाली पाहिजे, असे मत उदयराजे यांनी मांडले आहे.
कासचे सौंदर्य राखले पाहिजे, कोणी कसही बांधकाम करत आहे, जर ते इकोसेन्सेटीव बांधकाम केले असते तर ते चांगले दिसले असते. कासची उंची वाढवली, भूशी डॅम्पपेक्षा येथील डॅम्प चांगला आहे.
बऱ्याचशा हॉटेल धारकांची पहाणी केली पाहिजे, वेस्टेज डिस्पोज केले पाहिजे, जर सुप्रिम कोर्टाने आदेश दिला असेल तर मी काय करणार? असा प्रश्न उपस्थित करत उदयराजे म्हणाले, कास परिसरात जास्त कोणी बांधकाम करता कामा नये. काही लोकांनी तीन चार मजली बांधकामं केली आहेत. ज्यांनी या ठिकाणी विदृपीकरण केले त्याची आम्ही पहाणी करणार आहोत. महसुल खाते, पर्यावरण खाते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत एक बैठक घेऊन यातून काय मार्ग काढता येईल यावर चर्चा केली. कोणी आरेरावीची भाषा करत असेल तर ते कायद्याने तोडणारच."
शिवेंद्रराजेंची भूमिका
जिल्हाधिकाऱ्यांसोबत सर्वांसमोर चर्चा केली. ही बांधकामे कशी करावीत यासाठी आम्ही चर्चा केली. शासनाकडून काही पाहिजे असेल तर ते मी देतो. ही अतिक्रमणे नाहीत, वडिलोपार्जीत जमिनीवर बांधकामे केली आहेत. त्याचे शुल्क भरण्यास तयार आहोत, पर्यटन वाढवायचे असेल तर येणाऱ्या पर्यटकांना सुविधा दिल्या पाहिजेत, अन्यथा पर्यटन वाढणार नाही. प्रशासन जेसीबी घेऊन आले तर आम्ही बायकापोरांसह बुलडोझर समोर झोपू. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याचे नियम घालावे, बांधकामे कशी करायची त्यासाठी नियम द्या. राज्यातील अनेक अतिक्रमणे नियमीत केली तशी आमची अतिक्रमणे नियमीत करा, आम्ही जंगल काढा असे म्हंटले नाही, असे शिवेंद्र राजे यांनी म्हटले आहे.