2 वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी, महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी गोजेगावात सापडला
सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील संचिता साळुंखे (वय 22 वर्षे) महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. माहेरी येताना या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला सोबत आणले होते
सातारा : जिल्ह्यातील वडूथ येथील धक्कादायक घटनेने अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं. माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत (Krishna River) उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. मात्र, गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता. आज, अखेर 7 दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घना घडलेल्या ठिकाणापासून 8 किमी दूरवर आढळून आला आहे. संचिता साळुखे (वय 22) असं या महिलेचं नाव असून 27 जुलै रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर कृष्णा नदीपात्रात शोध मोहिम राबवण्यात आली, त्यावेळी मुलीचा मृतदेह सापडला होता. आता, 7 दिवसांनंतर आईचाही मृतदेह सापडला आहे. दरम्यान, या ह्रदयद्रावक घटनेनं आजही परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील संचिता साळुंखे (वय 22 वर्षे) महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. माहेरी येताना या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला सोबत आणले होते. मात्र, कौटुंबिक कारणास्तव या महिलने 27 जुलै रोजी आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली, तसेच आईच्या या कृत्यामुळे चिमुकलीला का शिक्षा, असे म्हणत अनेकांना शोक, सहवेदना व्यक्त केल्या. दरम्यान, 27 जुलै रोजी झालेल्या शोधमोहिमेत चिमुरड्या अक्षिताचा मृतदेह बचाव बथकाला सापडला होता. मात्र, आई संचिता तेव्हापासून बेपत्ता होती. आज महाबळेश्वर ट्रेकर्सच्या युवकांना घटनास्थळापासून आठ किलो मिटरवरील गोजेगाव गावाच्या हद्दीत मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आले. याबाबत, त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर, हा मृतदेह पाण्याबाहेर काढून नातेवाईकांना देण्यात आला. मात्र, आईचा मृतदेह सापडल्यानंतरही ग्रामस्थांकडून घटनेची आठवण काढून हळहळ व्यक्त होत आहे.
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, शोधमोहिमेला अडचण
घटनेच्या दिवशी महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी घेतल्याचे समजताच या परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर, कृष्णेच्या पात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली, त्यामध्ये दोन वर्षीय मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आलं होतं. तेव्हापासून आई संचिता बेपत्ता होती. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे कृष्णेच्या पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या नदीची पाणीपातळी तब्बल 40 फुटांहून अधिकवर पोहोचली आहे. असे असताना पाण्याच्या प्रवाहात या महिलेचा शोध घेताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आज ट्रेकर्संना या महिलेचा मृतदेह
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कृष्णा नदीच्या पात्रता उडी घेतलेली ही महिला काही दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. मात्र, आता या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह नदीत उडी घेतली. या घटनेचे नेमके कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही.