Satara Crime : साताऱ्यात अंधश्रद्धेचा कळस, ऊसाच्या शेतात नेऊन महिलेचं शीर धडा वेगळं केलं; मृतदेहाजवळ लिंबू-मिरची टाकली
Satara Crime : साताऱ्यात अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे.
Satara Crime : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वीडणी गावात अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. उसाच्या शेतात या महिलेचा शीर धडापासून वेगळे केलेला मृतदेह आढळून आलाय. मृतदेहाजवळ लिंबू, मिरची आणि हळदी कुंकु आढळून आलंय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचलेत.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या विडणी गावामध्ये पंचवीस फाटा जवळील ऊसाच्या महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आला आहे. शेतात कपड्यावर साडी, हळदी, कुंकू, काळी बाहुली, महिलेचे केस, सुरा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरातच अज्ञात महिलेचे अवयव वेगळे केलेला मृतदेह देखील आढळून आल्यामुळे परिसरात अघोरी कृत्य करून महिलेची हत्या असल्याची चर्चा आहे. कंबरे खालचा भाग त्यांच्या शेतात आढळून आला आहे. घटना स्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. खून प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. प्रदीप जाधव हे त्यांच्या उसाच्या शेतात पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळवले.
तंत्रमंत्राचा धाक दाखवून आरे कॉलनीत महिलेसह तिच्या दोन मुलींवर अत्याचार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तंत्रमंत्राचा धाक दाखवून महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर साताऱ्यातही अंधश्रद्धेतून महिलेला संपवण्यात आलं आहे. आरे कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी तंत्रमंत्राच्या साहाय्याने पतीचा आजार बरा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने 37 वर्षीय महिलेचा बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेच्या 14 व 16 वर्षांच्या मुलींचाही विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. भोंदूबाबाच्या अत्याचाराला विरोध केल्यास कुटुंबियांना जादुटोनाच्या मदतीने जिवे मारण्याची धमकी भोंदूबाबने महिलेला दिली होती.
याप्रकरणी आरे पोलिसांनी जादुटोणा विरोधी कायदा व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात भोंदूबाबा राजाराम यादव (वय 43) याला पोलिसांनी अटक केली होती.
बीड जिल्हा पुन्हा हादरला, दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या
आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे... तर एकजण गंभीर जखमी झाला आहे...पूर्व वैमनस्यातून घडलेल्या या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे...दरम्यान पोलिसांनी आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे...बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या वाहिरा या गावात आदिवासी समाजातील नातेवाईकात असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे... या घटनेत अजय भोसले आणि भरत भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे... तर कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.... खून झालेले दोघे आणि जखमी असलेला कृष्णा हे सख्खे भाऊ आहेत, तर खून झालेले आणि ज्यांनी हल्ला केला या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे... दरम्यान या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्ह्यातील हवे असलेले इतर गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या