मोठी बातमी : बगाड यात्रेत धक्काबुक्की, उदयनराजेंनी भोसलेंची हजेरी
Satara News : उदयनराजे भोसले यांनी बगाडाचे दर्शन घेतले. बगाड यात्रेत मोठी गर्दी असल्याने यावेळी धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे.
![मोठी बातमी : बगाड यात्रेत धक्काबुक्की, उदयनराजेंनी भोसलेंची हजेरी Satara Bagad Yatra Stampede Udayanaraje Bhosale Bagad Yatra huge crowd in the Bagad Yatra maharashtra news मोठी बातमी : बगाड यात्रेत धक्काबुक्की, उदयनराजेंनी भोसलेंची हजेरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/b26ed005a4a44ea77623fc8a07101c371711784503753322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : बगाड यात्रेत (Bagad Yatra) मोठी गर्दी असल्याने यावेळी धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. साताऱ्याच्या (Satara News) वाईमधील बगाड यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. बगाड यात्रेसाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी गर्दीत धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) यांनी बगाड यात्रेचे (Satara Bagad Yatra) दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. यावेळी धक्काबुक्की झाल्याची माहित आहे. धक्काबुक्कीमध्ये अनेक जण खाली कोसळले गेल्याचं सांगितलं जात आहे.
बगाड यात्रेला मोठी गर्दी
या बगाड यात्रेसाठी आज सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भैरवनाथ आणि जोगुबाईच्या नावाचा जयघोषाने परिसर दुमदुमुन गेलाय. दरम्यान हा बगाड बनवण्यासाठीचा सांगाडा हा गावातून नदी काठी आणण्यात आला असून या बगाडाला ओढण्यासाठी खास खिलारी बैल सजले आहेत.
सातारा जिल्ह्यातील बावधनचे बगाड
संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठे समजले जाणारे बगाड सातारा जिल्ह्यातील बावधनचे. या बगाडाचा आजचा मुख्य दिवस या बगाडासाठी राज्यभरातून भाविक हजेरी लावतात. आज बगाड्याला बगाडाला लटकवल्यानंतर दिवसभर गावातून हे बगाड रात्री उशिरा गावात येते. कृष्णा नदी काठावार बगाड्याला अंघोळ घालून बगाडाला लटकवण्यात येते. बगाडाचा बनवण्यात आलेला सांगाडा हा गावातून नदीकाठी आणण्यात येतो या बगाडाला ओढण्यासाठी खास खिलारी बैलांचा वापर केला जातो. भैरवनाथाच्या नावानं चांगभलं. जोगुबाईच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात सुरू झालेल्या या यात्रेला आज मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)