एक्स्प्लोर

SSC : दहावीचा पेपर सहावीच्या मुलींकडून तपासण्याचं प्रकरण, शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करणाऱ्यावरच निलंबनाची कारवाई 

Phaltan SSC Paper Check News : ज्याने या प्रकरणाची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली, त्या शाळेच्या कर्मचाऱ्यावरच निलंबनाची कारवाई संस्थेने केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

सातारा : दहावीतील विद्यार्थ्यांचे पेपर सहावीतल्या विद्यार्थ्यांनी तपासण्याचा प्रकार ज्याने समोर आणले त्या मंगेश अभंग याच्यावर शाळेने चार महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये (Phaltan SSC Paper News) हा प्रकार घडला होता. मंगेश अभंग हे या शाळेत शिपाई या पदावर कार्यरत असून त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये एका शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थिनींच्या मदतीने दहावीचे पेपर तपासले होते. तो प्रकार समोर आणणाऱ्याच्या विरोधात आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. माध्यमांना चुकीची माहिती देऊन शाळेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत मंगेश अभंग यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

काय म्हटलंय संस्थेने त्यांचा पत्रात? 

वैभव शेंडे हे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम करत असताना, सदर तपासणीसाठी 6 वीच्या मुलींची मदत घेत असल्याचा व्हिडीओ काढत, तसेच मख्याध्यापकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तो व्हिडीओ माध्यमांना पुरवण्यात आला. प्रत्यक्षात सदर शिक्षकाने संबंधित मुलींना मोकळ्या जागी रेषा मारण्याचं काम दिलं होतं. तुम्ही माध्यमांना दिशाभूल करणारी माहिती दिली. त्यानुसार आपल्यावर चार महिने निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. 

काय आहे प्रकरण?

दहावीच्या परीक्षेशी संबंधित एक धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात समोर आला. फलटण (Phaltan) तालुक्यातील विडणी गावातील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये शिक्षकानं थेट सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून दहावीच्या पेपरची तपासणी करून घेतल्याचा आरोप करण्यात आला. वैभव शेंडे असं या शिक्षकाचं नाव असून दहावीचा मराठी विषयाचा पेपर सहावीच्या विद्यार्थिनींच्या मदतीनं तपासला जात असल्याचा आरोप झाला. या संदर्भातील CCTV फुटेजही समोर आलं आहे. परंतु, त्या मुली पेपर तपासत नव्हत्या तर रिकाम्या पेपरवर रेषा मारत असल्याचा दावा शाळेने केला. 

या प्रकरणी ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली ते मंगेश अभंग म्हणाले की, "26 फेब्रुवारी रोजी मराठीचा पेपर हा सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासण्यात आला होता. सलग दोन दिवस हा प्रकार सुरू होता. हा प्रकार मी संस्थेच्या सचिवांच्या कानावर घातला. त्यानंतर ज्या शिक्षकांविरोधात मी तक्रार केली होती, त्यांनी मला दमदाटी केली. यानंतर मी शिक्षणाधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली.त्यावर मला संस्थेने कारणे दाखवा नोटीस बजावली. संस्थेतील सीसीटीव्ही तुम्ही सार्वजनिक केले असं सांगत मला नोटीस बजावण्यात आली. यामध्ये माझ्याकडून संस्थेची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला."

मंगेश अभंग म्हणाले की, "ज्या शिक्षकाने हे सर्व केलं त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र माझ्यावर कारवाई करण्यात आली. संस्थेच्या सचिवांचा मुलगा दहावीत आहे, त्याला मदत करण्यासंबंधी शिक्षकाकडून काहीतरी भूमिका घेतली गेली असावी म्हणून त्याच्यावर कारवाई न करता आपल्यावर कारवाई करण्यात आली असेल."

ही बातमी वाचा:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाची जोरधार! चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली, साताऱ्यात कृष्णा नदीचं पुन्हा रौद्ररूप, कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
राज्यभरात पावसाची जोरधार! चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली, साताऱ्यात कृष्णा नदीचं पुन्हा रौद्ररूप, कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget