Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले दिसताच शाळकरी मुलांची कळी खुलली; थेट रस्त्यावर राजेंसोबत 'फोटोसेशन'!
सातारचे (Satara News) छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale photo with students) यांची भुरळ भल्याभल्यांना आवरता आवरत नाही. यात अबालवृद्धांपासून ते लहान लेकरांपर्यंत हे चित्र पाहण्यास मिळते.
Udayanraje Bhosale : सातारचे (Satara News) खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale photo with students) यांची भुरळ भल्याभल्यांना आवरता आवरत नाही. यात अबालवृद्धांपासून ते लहान लेकरांपर्यंत हे चित्र नेहमीच पाहण्यास मिळते. असाच एक प्रकार सातारमध्ये नुकताच पहायला मिळाला तो साताऱ्यातील करंजे या ठिकाणच्या एका कार्यक्रमादरम्यान. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सातारा शहरातील करंजे भागात उदयनराजे भोसले एका कार्यक्रमानिमित्ताने पोहोचले होते. पोहोचल्यानंतर गर्दी होणं साहजिकच होतं. गर्दीला बाजूला करत करत उदयनराजे कार्यक्रमस्थळी जाऊ लागले. दरम्यान, त्याच गर्दीतून वाट काढत विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघालेली एक रिक्षा अचानक त्यांच्यासमोर येऊन थांबली. ही रिक्षा विद्यार्थ्यांनी भरलेली होती.
उदयनराजे..उदयनराजे..उदयनराजे, विद्यार्थ्यांचा गजर
उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) दिसताच विद्यार्थ्यांनी एकच आवाज टाकण्यास सुरुवात केली. उदयनराजे..उदयनराजे..उदयनराजे. त्यामधील काही विद्यार्थ्यांनी तर रिक्षाचालक म्हणजे शाळकरी मुलांचे अंकलना आग्रह करण्यास सुरुवात केली. अंकल रिक्षा थांबवा, अंकल रिक्षा थांबवा. त्यामुळे अंकलनेही कोणताही न विचार करता रस्त्यातच गाडी थांबवली आणि शाळेतली सगळी पोरं धडाधडा रिक्षातून खाली उतरल्याने उदयनराजे बघतच राहिले.
फोटो काढण्यासाठी आग्रह
रिक्षातून उतरताच त्यातील एका मुलीने धाडस केले. मला फोटो काढायचा आहे, एक म्हणता म्हणता सगळ्याच मुलांनी धाडस केलं. सगळ्याच पोरांनी फोटो काढण्यासाठी आग्रह धरला आणि हसऱ्या चेहऱ्याने उदयनराजेंनी सर्वच शाळकरी मुलांना जवळ बोलावलं आणि फोटोसेशन केलं. फोटोसेशन दरम्यान मात्र पोरांची उदयनराजेंनी चांगलीच चेष्टा केली. माझ्यासोबत फोटो काढला, तर तुम्ही नापास होणार असं सांगताच काही पोरं हसली आणि ज्यांना कळाले नाही ती पोरं मात्र डोक्यावर आठ्या घालून रिक्षात बसली, पण काही असो उदयनराजेंची शाळकरी मुलांन बरोबरची क्रेझ मात्र या निमित्ताने दिसून आली.
इतर महत्वाच्या बातम्या