(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kaas Pathar : कास पठाराच्या पर्यावरणपूरक पर्यटनाला मिळणार चालना, पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण
Kaas Pathar : राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते साताऱ्यातील कास पठार येथे चार- ई बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.
Satara Kaas Pathar : राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते साताऱ्यातील कास पठार येथे चार- ई बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, सुरक्षा वाढविणे तसेच, घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी लोढा यांनी सांगितले. ई बसेसमुळे कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होईल.
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ऑनलाईन ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीमंत छत्रपतीउदयनराजे भोसले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सरपंच यांचे आभार मानले. कास पठाराच्या संवर्धनासाठी तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी लोढा म्हणाले, पर्यटन विकासासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे, स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेले कास पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिक रित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन महाबळेश्वरचे जे धोरण तयार केले आहे त्यामध्येही कास पठारच्या विकासाला निश्चीत वाव देण्यात येईल.
कास पठार के संवर्धन के लिए मुख्यमंत्री मा.@mieknathshinde जी और उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी के मार्गदर्शन में महाराष्ट्र सरकार द्वारा वहां पर ई बस सेवा और बायो टॉयलेट जैसे विविध उपक्रम शुरू किए जा रहे हैं!@CMOMaharashtra @maha_tourism @MahaDGIPR pic.twitter.com/MfATseb3lj
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) September 22, 2022
निसर्गरम्य कास पठार
सहयाद्री पर्वतराजीत सातारा शहरापासून 25 कि.मी. अंतरावर निसर्गरम्य असे कास पठार आहे. या पठारावर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात रंगांचा बहर जवळपास 10 चौरस कि.मी. मध्ये पाहायला मिळतो. 850 वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी पहायला मिळतात. त्यामुळे विविध प्रकारची फुलपाखरे देखील बगडतात. जून ते ऑक्टोबर या कालावधीत फुलांच्या रोपांचे चक्र वाढत असल्याने पठार दर 15-20 दिवसांनी रंग बदलत असल्याचे दिसते. वनस्पती विज्ञानासाठी अजूनही नवीन असलेल्या अनेक जाती पठारावर आढळतात. तसेच अनेक स्थानिक व लुप्त होत चालेल्या वनस्पती सुद्धा इथे आढळून येतात. कास पठार हे वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासात भविष्यातील संशोधनासाठी उपयोगी ठरेल. गेल्या 4-5 वर्षात हे स्थळ पर्यटकांना आकर्षित करत आहे. कास पठाराला हंगामात दररोज तीन हजार पेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. पावसाळ्यात हा संपुर्ण परिसर सौदर्याने अतिशय बहरलेला दिसतो. या परिसरात ठोसेघरचा धबधबा, बामनोली येथे कोयनेचा जलाशय, वासोटा किल्ला, सज्जनगड किल्ला, अशी विविध पर्यटन स्थळे आहेत.