Satara News : साताऱ्यात पहिल्यांदा शरद पवार गटाचा बॅनर काढण्याचा प्रयत्न, नंतर अजित पवार गटाने जेसीबी समोर आणून लावला!
अजितदादा येत असतानाच असा बॅनर लागल्याने शरद पवार गटाने लावण्यात आलेला बॅनर काढण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर नंतर चक्क अजित पवार गटाने बॅनरसमोर जेसीबी आणून उभा केल्याने भूवया उंचावल्या.
सातारा : साताऱ्यातील लोणंदमध्ये नळ योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज दौऱ्यावर आहेत. अजितदादा येणार असल्याने समर्थकांनी जय्यत तयारी लोणंद शहरात करण्यात आली आहे. अजित पवारांच्या स्वागतासाठी भले मोठे बॅनर लोणंद शहरात उभारण्यात आलं आहे. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरजवळ शरद पवार गटाकडूनही बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरवर निष्ठेत तडजोड नाही, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे. अजितदादा येत असतानाच असा बॅनर लागल्याने शरद पवार गटाने लावण्यात आलेला बॅनर काढण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर नंतर चक्क अजित पवार गटाने बॅनरसमोर जेसीबी आणून उभा केल्याने भूवया उंचावल्या.
सातारा जिल्ह्यात राजकीय कलगीतुरा रंगला
दुसरीकडे, सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यात राजकीय वाद टोकाला गेला आहे. रामराजेंनी टीकास्त्र सोडल्यानंतर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीतही ते तुतारीचं काम करणार आहेत. रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, रामराजे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. ही अफवाही असू शकते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीत तुतारीचं काम केलं होतं आणि विधानसभा निवडणुकीतही ते तुतारीचं काम करणार आहेत. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या दाव्याने भूवया उंचावल्या आहेत.
तुम्ही अजितदादांना सोडून तिकडे चालले आहे का?
दुसरीकडे, रामराजे नाईक निंबाळकर यांनीही फलटणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पुढील निर्णय काय घ्यायचा? असा सवाल केला. यावेळी कार्यकर्त्यांमधून 'तुतारी'साठी जल्लोष झाला.रामराजे म्हणाले की, "मला काल काही चॅनेल्सकडून फोन आला, त्यांनी विचारलं तुम्ही अजितदादांना सोडून तिकडे चालला आहात का? मला काय बोलायचं हेच सुचेना. ही चर्चाच झाली नाही, तरीही ती चर्चा राज्यभर पसरली. कदाचित आपल्याच विरोधकांनी ही बातमी दिली असेल. मी तिकडे गेलो तर आपल्याला विधानसभेत कमळावर उभं राहता येईल असं त्यांना वाटत असेल, अशी टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या