Devendra Fadnavis :हर्षवर्धन म्हणाले, फडणवीसांनी शक्य ती मदत केली, आता त्यांच्याच राष्ट्रवादी प्रवेशावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...Video
Devendra Fadnavis : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावर भाष्य केलं.
नागपूर : भाजप नेते हर्षवर्धन पाटील आज पक्षांतर करणार आहेत. हर्षवर्धन पाटील इंदापूर येथील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ते म्हणाले, तुम्ही नवीन काय सांगताय, ही तर जुनी न्यूज आहे, ही आजची न्यूज थोडी आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतरावर अधिक भाष्य करणं टाळलं आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाबाबत संजय राऊत काय म्हणाले?
खासदार संजय राऊत यांनी हर्षवर्धन पाटील यांचं महाविकास आघाडीत येणं ही आमच्या सगळ्यांसाठी शुभशकून आहे. हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे. ये तो सिर्फ झांकी है पिक्चर अभी बाकी है, असं संजय राऊत म्हणाले.कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठं जातात. ज्या दिवशी महाराष्ट्रात आचारसंहिता लागेल त्यादिवशी महाविकास आघाडीत येण्याचा प्रवाह आणि ओघ वाढेल, असं संजय राऊत म्हणाले.
सुप्रिया सुळे भरत शाह यांच्या भेटीला
लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूरमधील भरत शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. आज हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशापूर्वी सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशापूर्वी भरत शाह यांच्या भेटीला गेल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे इंदापूर शहरातील शाह कुटुंबाच्या भेटीसाठी दाखल झाल्या आहेत. शाह कुटुंब इंदापूर शहरातील एक मोठे राजकीय घराणे आहे. भरत शहा कर्मयोगी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत तर ते माजी उपनगराध्यक्ष सुद्धा राहिले आहेत तर अंकिता मुकुंद शहा या इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष राहिल्या आहेत. हर्षवर्धन पाटील हे आज शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. शहा कुटुंब आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय विरोध आहे. हा विरोध मिटवण्यासाठी सुप्रिया सुळेंची शहा कुटुंबाकडे मनधरणी सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधील कार्यकर्ते अस्वस्थ झाले, जनतेनं उठाव झाला आणि त्यांनी तुतारी हातात घेण्यास सांगितलं. राजकारणात असं पहिल्यांदा घडत असून लोकशाहीत लोकांच्या मतांचा आदर करावा लागतो, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत.
देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत काय म्हणाले?
इतर बातम्या :