एक्स्प्लोर

धक्कादायक! कराडमध्ये गोळीबार, अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी, पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याची शक्यता

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये (Karad) धक्कादायक घटना घडली आहे. कराडमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. या गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी झाले आहेत.

Satara Karad News : सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये (Karad) धक्कादायक घटना घडली आहे. कराडमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. या गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुरेश काळे असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. सुरेश काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

नेमकी कशी घडली घटना?

दरम्यान, कराड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार होली फॅमिलीच्या मागील बाजूस ओम कॉलनी आहे. त्या कॉलनीमध्ये अक्षरा गृहनिर्माण सोसायटी आहे. त्यामध्ये 20 फ्लॅट आहेत. त्या सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घोलप हे 12 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यास इमारतीत पहिल्या मजल्यावर पाच वर्षापासून सुरेश काळे राहत आहेत. आज रात्री साडेआठच्या सुमारास काळे त्या सोसायटीमध्ये आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी रस्त्यावर आडवी लावली होती. तेथून अध्यक्ष घोलप त्याच वेळी जात होते. त्यावेळी त्यांनी काळे यांना दुचाकी बाजूला लावा लोकांना वाट द्या, असे सांगितले त्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर काळे तिथून गेला मात्र अर्ध्या तासात तो पुन्हा त्यांच्या घरी गेला. त्यावेळी घोलप जेवत होते. बेल वाजल्याने त्यांनी दरवाजा उघडला तर समोर काळे होता. मला तुमच्याशी बोलायचं आहे असे त्याने घोलप यांना सांगितले. घोलप यांनी जेवण करून आलो. आत बसा असे म्हटले मात्र त्यांनी बसण्यास नकार दिला. ते जेवत असतानाच घरात घुसलेल्या काळे यांनी थेट फायरिंग चालू केली. गावठी कट्ट्यातून त्याने केलेल्या फायरिंगमध्ये घोलप यांच्या चेहऱ्याला गोळी लागली आहे. यावेळी तिथे त्यांची लहान मुलगी आली होती, तिलाही गोळ्या लागल्या आहेत. 

पोलिसांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न 

फायरिंग झाल्यामुळं मोठा आवाज झाला. यानंतर घोलप कुटुंबीयांनी आरडा-ओरडा सुरु केली त्यामुळं घटनास्थळी लोक जमले. काही वेळात पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात पाठवले. त्यानंतर घटनेची माहिती घेतली. आरोपी सुरेश काळे याने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. त्याच्यासोबत त्याच कुटुंबही होतं, त्याच्याकडे गावठी कट्टा पिस्तूल असल्यामुळे पोलिसांनी सावधगिरीने दरवाजा उघडण्याची विनंती केली. दरवाजा उघडल्यानंतर काळे याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शांत करत ताब्यात घतलं. मात्र, त्याच्याकडील पिस्तूल कुठे आहे तो सांगत नव्हता. त्याने त्याच्या धान्याच्या डब्याखाली पिस्तूल लपवून ठेवली होती. पोलिसांनी ही पिस्तूल ताब्यात घेतली आहे. त्यासोबत 16 जिवंत काडतुसे देखील पोलिसांना घरात मिळाली आहेत. संशयित आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील होईल आहे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas : कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
Rajan Salvi : काल म्हणाले मी निष्ठावंत शिवसैनिक, आज राजन साळवींचा सूर बदलला; म्हणाले, 'योग्यवेळी योग्य निर्णय'
काल म्हणाले मी निष्ठावंत शिवसैनिक, आज राजन साळवींचा सूर बदलला; म्हणाले, 'योग्यवेळी योग्य निर्णय'
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, सोनं  900 रुपयांपर्यंत वाढलं, आजचे दर नेमके किती?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या दरात चमक, आजचे दर जाणून घ्या
Weather Update : दिल्लीत दाट धुक्यांमुळे तब्बल 202 उड्डाणे उशीराने, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ बंद; हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान उणे 14 अंशांवर
दिल्लीत दाट धुक्यांमुळे तब्बल 202 उड्डाणे उशीराने, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ बंद; हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान उणे 14 अंशांवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 3 PM 03 January 2025Devendra Fadnavis Speech Satara | शेरो शायरी, छगन भुजबळ यांचं कौतुक;देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषणKamlesh Kamtekar Rickshaw Driver:जॉब गेलेला ग्राफिक डिझायनर ते रिक्षाचालक,कमलेशचा प्रेरणादायी प्रवासAvinash Jadhav On Mumbra Marathi : या मराठी मुलाला हात लावून दाखवा, घरात घुसून..... मनसे आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas : कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
Rajan Salvi : काल म्हणाले मी निष्ठावंत शिवसैनिक, आज राजन साळवींचा सूर बदलला; म्हणाले, 'योग्यवेळी योग्य निर्णय'
काल म्हणाले मी निष्ठावंत शिवसैनिक, आज राजन साळवींचा सूर बदलला; म्हणाले, 'योग्यवेळी योग्य निर्णय'
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, सोनं  900 रुपयांपर्यंत वाढलं, आजचे दर नेमके किती?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या दरात चमक, आजचे दर जाणून घ्या
Weather Update : दिल्लीत दाट धुक्यांमुळे तब्बल 202 उड्डाणे उशीराने, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ बंद; हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान उणे 14 अंशांवर
दिल्लीत दाट धुक्यांमुळे तब्बल 202 उड्डाणे उशीराने, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ बंद; हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान उणे 14 अंशांवर
रात्र झाली तरी याला सोडणार नाही; वॉच ठेवणाऱ्या पोलिसाला जितेंद्र आव्हाडांनी धरलं, थेट वरिष्ठांना फोन
रात्र झाली तरी याला सोडणार नाही; वॉच ठेवणाऱ्या पोलिसाला जितेंद्र आव्हाडांनी धरलं, थेट वरिष्ठांना फोन
बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आता ऑनलाईनच; नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्रींचा मोठा निर्णय
बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आता ऑनलाईनच; नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्रींचा मोठा निर्णय
Rohit Sharma : 'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
Beed Crime: मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; संतोष देशमुखांच्या भावाने गंभीर आरोप केलेल्या बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
Embed widget