एक्स्प्लोर

महाबळेश्वरमधील ब्रिटीशकालीन सर्व पॉईंटची नावे बदला, भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समितीचं तहसीलदारांना पत्र

Mahabaleshwar Points Name : महाबळेश्वरातील पॉईंट दिलेली इंग्रज अधिकाऱ्यांची नावे बदलून क्रांतिकारकांची नावे द्यावीत, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन समिती आणि भाजपने केली आहे. नाव बदलण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे.

Mahabaleshwar Points Name : थंडगार हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचे (Mahabaleshwar) वातावरण आता तापणार की काय अस प्रश्न सध्या पडला आहे. त्याचे कारण महाबळेश्वरातील पॉईंटला (Points) देण्यात आलेली इंग्रज अधिकाऱ्यांची नावे तातडीने बदलावी आणि या सर्व पॉईंटला क्रांतिकारकांची नावे द्यावीत, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन समिती (Hindu Ekta Andolan Sammiti) आणि भाजपच्या (BJP) वतीने करण्यात आली आहे. भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समितीने याबाबत महाबळेश्वरच्या तहसीलदारांना पत्र लिहिलं आहे. नाव बदलण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे.  15 ऑगस्टपर्यंत या सगळ्या पॉईंटला क्रांतिकारकांची नावे द्या अन्यथा आम्ही नावे बदलू असा इशारा देण्यात आला आहे. 
 
महाबळेश्वरमधील पॉईंटची नावे 
ऑर्थरसिट, विल्सन पॉईंट, लॉडविक पॉईंट, लेस्ली विल्सन पॉईंट, केटस् पॉईंट, एलिफन्ट हेड, निडल होल पॉईंट, बेबींन्टन पॉईंट, इको पॉईंट, बॉम्बे पॉईंट, लिंग मळा वॉटर फॉल पॉईंट, किंग चेअर पॉईंट, विंडो पॉईंट, हन्टिंग पॉईंट, टायगर स्प्रिंग पॉईंट, कॅसल रॉक पॉईंट, मंकी पाईंट पॉईंट, मरजोरी पॉईंट, कॅटस पाईंट पॉईंट, मिडल पॉईंट, सनसेट पॉईंट, प्लॅटो पॉईंट, वेण्णालेक पॉईंट, पारसी पॉईंट

महाबळेश्वरचा थोडक्यात इतिहास 
1819 मध्ये मराठा साम्राज्याचे पतन झाल्यानंतर ब्रिटीशांनी महाबळेश्वरच्या आसपासच्या डोंगरांना साताऱ्याच्या जिल्ह्याला जोडले. 1828 मध्ये ब्रिटीशांनी महाबळेश्वरच्या बदल्यात सातारच्या महाराजांना काही शहरे दिली. जुन्या नोंदीमध्ये महाबळेश्वरला गव्हर्नरच्या नावाने माल्कम पेठ म्हटले गेले. ब्रिटीश शासकांना हिल स्टेशनमध्ये इंग्लंडसारखे वातावरण हवे होते. हे लक्षात घेऊन युरोपीयन वनस्पती स्ट्रॉबेरी महाबळेश्वरमध्ये लावल्या आणि लायब्ररी, थिएटर, बोटिंग, तलाव, क्रीडांगणे या सारख्या सुविधा विकसित केल्या. 19 व्या शतकाच्या समाप्तीपूर्वी हे जगातील प्रचलित हिल स्टेशन म्हणून ओळखले जाऊ लागले.  
 
महाबळेश्वरचे वैशिष्ट्ये 
- महाबळेश्वर हे समुद्रसपाटीपासून सुमारे 4500 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेले थंडगार हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. 
- महाबळेश्वरमध्ये प्रत्येक वर्षी 15 लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असतात 
- महाबळेश्वरात 12 महिने पर्यटकांची रेलचेल सुरु असते 
- महाबळेश्वरवासियांचा संपूर्ण व्यवसाय हा पर्यटकांवर आवलंबून आहे 
- महाबळेश्वरातील दऱ्याखोऱ्यामधील निसर्ग हा पर्यटकांना आकर्षित करत असतो 
- महाबळेश्वरात बाराही महिने थंडी जाणवते 
- उन्हाळ्यात दुपारचा थोडफार कालावधी गेला तर उन्हाळ्यातही महाबळेश्वरात थंडी जाणवते. 
- महाबळेश्वरात हिवाळ्यात अनेक भागात दवबिंदू गोठण्याइतका पारा खालावतो 
- विविधतेने नटलेला निसर्ग या महाबळेश्वरचे खास वैशिष्ट्ये मानले जाते 
- महाबळेश्वरातील क्षेत्र महाबळेश्वर याच एक वेगळेच वैशिष्ट्ये मानले जाते. या ठिकाणी पाच नद्यांचा उगम होतो आणि नंतर या नद्यांचे महाकाय रुप पुढे गेल्यावर पाहायला मिळते 
- या ठिकाणची पिकवली जाणारी स्ट्रॉबेरी ही जगप्रसिद्ध आहे 
- छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाबळेश्वर आहे 
 
जरी या महाबळेश्वरातील ही नावे ब्रिटीशकालीन असली तरी आता महाबळेश्वरवासियांना मात्र या नावाच्या बदलाबाबत आक्षेप असू शकत. त्यामुळे या नावात बदल करायचा झाला तर अंगवळणी पडलेली ही नावे बदलताना स्थानिकांच्या संघर्षाला समोरे जावे लागणार यात शंका नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Vs Sanjay Shirsat : Eknath Shinde यांच्या बॅगेत नेमकं काय? राऊत - शिरसाटांमध्ये खडाजंगी!Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Embed widget