एक्स्प्लोर

मोठी बातमी : साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीशप्रकरणात नवा ट्विस्ट, आणखी बडा मासा गळाला

Satara Court Judge Bribe Case : साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीशप्रकरणाला नवा ट्विस्ट प्राप्त झाला असून या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Satara Court Judge Bribe Case सातारा : साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीशप्रकरणाला नवा ट्विस्ट प्राप्त झाला असून या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायाधिशांना पाच लाखाच्या लाच प्रकरणात सहाय्य करणाऱ्या इतर तिघा आरोपींपैकी एक पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले आहे. आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले आहे.

किशोर खरात हे मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असून वरळी येथे ते कार्यरत  असल्याची माहिती पुढे आली आहे. तर न्यायाधीश धनंजय निकम यांची पाच लाखांची लाच घेण्याच्या प्रक्रियेत किशोर खरात यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. तर धनंजय निकमसह चौघांचा काल सातारा जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. परिणामी या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून या प्रकरणात आणखी एक बडा मासा गळाला लागला आहे. 

साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीशप्रकरणात नवा ट्विस्ट

आरोपीस जामीन मिळवून देण्यासाठी चक्क न्यायाधीशांनीच लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यातून समोर आला होता. विशेष म्हणजे एसीबीने रंगेहात पकडल्याने हा भांडाफोड झाला. साताऱ्यातील सत्र न्यायालय परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये न्यायाधीश (Judge) महोदयांसह आणखी तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्ये, चक्क न्यायाधीश महोदयांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपींच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला असता, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने (Court) आरोपी न्यायाधीश महोदयांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे, लाच घेणाऱ्या न्यायाधीश महोदयांना न्यायालयानेच फटकारल्याचं दिसून आलं. 

5 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी रंगेहात एसीबीच्या जाळ्यात

साताऱ्यातील लाच प्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायाधिशांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने काल(शुक्रवारी) फेटाळला. 5 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी जाळ्यात अडकलेले धनंजय निकम यांच्या जामीन अर्जावर काल सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार देत त्यांचा अर्ज फेटाळून लावला. सातारा लाच लुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचून न्यायाधीश निकम यांच्यासह चौघांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एका खटल्यातील संशयीत आरोपीला जामीन देण्यासाठी न्यायाधिशांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याबद्दल तक्रारदाराच्या माहितीवरुन लाच लुचपत विभागाने छापा मारत ही कारवाई केली होती. 

सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचे ठिकाण म्हणून न्यायालयाकडे पाहिले जाते. पोलिसांकडून अन्याय झाल्यानंतरही न्यायालयात आपण पाहू, न्यायालयात आपणास न्याय मिळेल, अशी भावना सर्वसामान्यांची असते. मात्र, न्यायाधीश महोदयच लाच घेताना रंगेहात पकडल्यामुळे न्यायपालिकेवरही शंका उपस्थित झाली. तसेच, न्यायालयाच्या कामकाजाला धक्का पोहोचवण्याचं काम न्या. निकम यांच्या कृत्याने केलं. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान आढावा ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 March 2025Majha Hasya Kavi Sanmelan on Holi Festival | एबीपी माझा हास्य कवी संमेलन 2025 ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget