Santosh Deshmukh Murder Case Update: संभाजी वायभसेने पत्ते उघडले अन् सुदर्शन घुले, सुधीर सांगळेचा ठावठिकाणा समजला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई
Santosh Deshmukh Murder Case Update: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
Santosh Deshmukh Murder Case Update बीड: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) याच्यासह सुधीर सांगळेला (Sudhir Sangle) पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहेत. कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर असल्याची माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नांदेडमधून डॉ. संभाजी वायभसे, त्याची पत्नी आणि आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं. एसआयटीकडून तिघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. आरोपींना संभाजी वायभसेने पैसे पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच संभाजी वायभसेच्या चौकशीतून आरोपींचा ठावठिकाणा समजल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आरोपींना कसं घेतलं ताब्यात?
या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या व्यक्तीने पळून जाण्यासाठी मदत केली होती, त्यांच्याकडून काही लिंक्स मिळाल्या. काही माहिती मिळाली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे तिघे ज्या लोकांच्या संपर्कात होते, त्यांच्याकडून माहिती घेतली गेली. त्यानंतर पोलिसांनी आणि स्पेशल टीमने त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. या दोघांना पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे. याबाबत कोणताही अधिकृत दुजारा दिलेला नाहीये. या तिघांच्या मागे एसआयटी सोबतच सीआयडी आणि बीड पोलिसांची टीम होती. या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आणि तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून या आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतर काही माहिती मिळवली. त्याचबरोबर या तीन आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद ठेवले होते. नवीन सिम घेतले होते. पण त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची माहिती मिळाली आणि त्या आधारे या दोघांना अटक केलेले आहे. या प्रकरणातील ते मुख्य आरोपी आहेत. तिसरा आरोपी फरार आहेत. त्याला त्याला देखील पकडण्यात पोलिसांना लवकरच यश येईल अशी अपेक्षा आहे. या हत्या प्रकरणांमध्ये डॉक्टर वायबसे यांच्यासह त्याची वकील त्यांना एसआयटीने ताब्यात घेतलेलं आहे.
कोण आहे संभाजी वायभसे?
संभाजी वायभसे हा स्वतःचा हॉस्पिटल बीड शहरांमध्ये काही वर्षांपूर्वी चालवायचा. मात्र तो नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे याच्यासोबत तो काम करायचा अशी माहिती आहे, ऊसतोड मुकादम असे काम करत असताना त्या तिघांसोबत डॉक्टरचा संबंध आला. संभाजी वायभसे सध्या डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही. त्याची पत्नी वकील आहे. त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलेलं आहे. ते संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून संभाजी वायभसे फरार असल्याची माहिती होती. पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. मात्र तो सापडत नव्हता. सुदर्शन घुले सह संभाजी वायभसे देखील राज्याबाहेर गेले असल्याची माहिती होती, त्याने राज्य बाहेर जाऊन सुदर्शन घुले याला मदत केली होती. संभाजी वायभसेपर्यंत पोलीस पोहोचले, तेव्हा या दोघांची माहिती मिळाली अशी माहिती आहे. या प्रकरणाच्या कुटुंबाचा समावेश आहे का याचाही तपास केला जातोय. संभाजी वायभसे हा पोलिसांना नांदेड शहरात सापडला. काल त्याला ताब्यात घेतलं, रात्री त्याला बीडमध्ये आणलं, त्यानंतर त्याची चौकशी झाली. त्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आला आहे.