Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी; वाल्मिक कराडच्या आरोप निश्चितीबाबत युक्तीवाद होण्याची शक्यता
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Case) आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणी 3 जून रोजी झाली होती.

बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणी 3 जून रोजी झाली होती. यासाठी सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची उपस्थिती होती. दरम्यान उज्वल निकम यांच्याकडून आरोप निश्चिती करून घ्यावी, असा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता. तर वाल्मीक कराडच्या वकीला कडून अद्याप डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले. दरम्यान आज कराडच्या आरोप निश्चितीबाबत आणि डिजिटल एव्हिडन्स आरोपीच्या वकीलांना मिळण्याबाबत युक्तीवाद होण्याची शक्यता आहे.
वाल्मिक कराडच्या आरोप निश्चितीबाबत युक्तीवाद होण्याची शक्यता
बीडच्या विशेष न्यायालयात आज साधारणत: 11 वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. मागील सुनावणी 3 जून रोजी झाली होती. याच सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती होती, तर यावेळी उज्वल निकम यांच्याकडून अतिशय महत्वाचे म्हणणे मांडण्यात आलं होतं. यात वाल्मिक कराडच्या आरोप निश्चितीबाबत म्हणणे मांडण्यात आलं होतं. मात्र या मुद्द्याला घेऊन आरोपीच्या वकिलासोबत युक्तीवाद झाला होता. अशातच डिजिटल एव्हिडन्स अद्याप प्राप्त झालेले नाही. ते प्राप्त व्हावे, अशी मागणी वाल्मिक कराडच्या वकीलाकडून करण्यात आली होती. त्यामुळे याच मुद्द्यावरून आज पुन्हा युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. परिणामी आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संतोष देशमुख यांचा मुलगा सैनिकी शाळेत घेणार शिक्षण
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांनी विराज देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. त्यानुसार आता विराज देशमुख हा सांगली जिल्ह्यातील रेठेधरण येथील सैनिकी शाळेमध्ये शिक्षण घेणार आहे.याबाबतचे पत्र वर्षा निवासस्थानी झालेल्या महेश सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना सुपूर्द करण्यात आलेय. यावेळी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार तसेच आमदार सदाभाऊ खोत यांची देखील उपस्थिती होती.
हे ही वाचा
























