Farmer Protest : दिल्ली सीमेवर असलेला खिळ्यांचा वेढा हा भारत-चीन सीमेवर हवा होता, संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला
Farmer Protest : शेतकरी आणि पंतप्रधानांच्या मध्ये केवळ एका कॉलचे अंतर असेल तर मग हे आंदोलन मिटत का नाही असा सवाल खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला. तसेच दिल्ली सीमेवर लावलेले खिळे भारत-चीन सीमेवर लावले असते तर चीनी सैन्य भारतात घुसलं नसतं असेही ते म्हणाले.
नवी दिल्ली: शेतकरी दिल्लीत येऊ नयेत म्हणून दिल्लीच्या सीमेवर खिळे लावले जात आहेत, हे खिळे जर भारत-चीन सीमेवर लावले असते तर चीनचं सैन्य भारतात घुसलं नसतं असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लावला आहे. शेतकऱ्यांना अतिरेक्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदार संजय राऊत आज दिल्लीतील शेतकरी आंदोलकांची भेट घेणार आहेत.
खासदार संजय राऊत म्हणाले की, "भारत-चीन सीमेवर अशा प्रकारचे खिळे लावले असते तर चीनचं सैन्याने 20 किलोमीटर आतमध्ये घुसून आमच्या जमिनी ताब्यात घेतल्या नसत्या. शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत मात्र हा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे, हे दुदैव आहे."
खासदार संजय राऊत पंतप्रधानांवर टीका करताना म्हणाले की, "एक कॉल करुन जर आंदोलन मिटत असेल तर मग त्याला विलंब का? मी शेतकरी आंदोलकांना भेटायला जातोय. त्याची मला परवानगी देण्यात आली नाही, पण मी कुणाला घाबरत नाही. आम्हाला पोलिसांनी अडवलं, अटक केली तरी बेहत्तर, त्याची चिंता नाही."
Farmer Protest : संजय राऊत आज गाझीपूर बॉर्डरवरील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार
संपूर्ण शिवसेना, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठाम असल्याचं सांगत संजय राऊत म्हणाले की, "शेतकऱ्यांना नैतिक पाठिंबा देणं आवश्यक आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिल्लीत जाऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देता येत नसेल तरी जिथे ते आहेत त्या ठिकाणाहून त्यांनी पाठिंबा द्यावा. हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि हाच तिरंग्याचा सन्मान आहे."
दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेसार राज्यसभा खासदार संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर आंदोलक दुपारी 1 वाजता शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. ही माहिती संजय राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे.
Sanjay Raut | दिल्ली हिंसाचार हा शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीचा पूर्वनियोजित कट -संजय राऊत