(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : सर्व भ्रष्ट लोक घ्यायचे, तुमचा पक्ष कुठय? भाजपची भ्रष्ट काँग्रेस झाली; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले, श्रीरामपूरमध्ये ठीक ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे स्वागत झाले. श्रीरामपूर जणू अयोध्या झाली, सत्याचे शिवधनुष्य उद्धव ठाकरे घेऊन जात आहेत. सत्ताधारी फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. एखादा पक्ष फोडायचा त्यांचा नेता घ्यायचा. अजित पवार गेले,शिवसेनेतून मिंध्ये गेले आणि अशोक चव्हाण गेले.
श्रीरामपूर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा हल्लाबोल सुरुच आहे. "सर्व भ्रष्ट लोक घ्यायचे, तुमचा पक्ष कुठय? भाजपची भ्रष्ट काँग्रेस झाली आहे", असे खासदार संजय राऊत म्हणाले. ते श्रीरामपूर येथील सभेत बोलत होते.
श्रीरामपूर जणू अयोध्या झाली
संजय राऊत म्हणाले, श्रीरामपूरमध्ये ठीक ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे स्वागत झाले.श्रीरामपूर जणू अयोध्या झाली, सत्याचे शिवधनुष्य उद्धव ठाकरे घेऊन जात आहेत. सत्ताधारी फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. एखादा पक्ष फोडायचा त्यांचा नेता घ्यायचा. अजित पवार गेले,शिवसेनेतून मिंध्ये गेले आणि अशोक चव्हाण गेले. अशोक चव्हाण भाजपवासी झाले, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.
अशोक चव्हाण यांचे वाईट वाटत नाही भाजपची दया येते
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, अशोक चव्हाण यांचे वाईट वाटत नाही भाजपची दया येते. मोदींपासून सर्वानी अशोक चव्हाण यांच्यावर एवढे आरोप केले. कोर्टात गेले, मोदी नांदेडला आले होते. त्यांनी भाषणात सांगितले. "फडणवीस बोलले होते की अशोक चव्हाण हा लीडर नाही डीलर आहे".
आता काय केले? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा
आता नवा नारा आला आहे. भ्रष्टाचाराचा एकच नारा आहे. तुरुंगापेक्षा भाजप बरा. हा नारा आता अशोक चव्हाण यांनी दिला, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांचा जांगलाच समाचार घेतला.
अब्दुल सत्तार नावाचा चोर जेलमध्ये असेल, संजय राऊतांची जहरी टीका
संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरही यावेळी बोलताना सडकून टीका केली. अब्दुल सत्तार नावाचा चोर पुढील चार महिन्यात जेलमध्ये असेल. आपलं सरकार येणार आणि किमान 12 महिने जेलमध्ये असेल, असा हल्लाबोल संजय राऊत केलाय.
घाबरट असतील त्यांनी भाकड जनता पार्टीत जा; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
उद्धव ठाकरेंनी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा टीका केली आहे. घाबरट असतील त्यांनी भाकड जनता पार्टीत जा. मी तुमच्या साठी नाही जनतेसाठी मैदानात उतरलो आहे, असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या
अशोक चव्हाणांना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, पण भाजपच्या बड्या नेत्याचा विरोध, वाचा Inside Story