(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli mass suicide : पहिल्यांदा लाईट घालवली, मग मांत्रिकाने काळ्या चहातून विष देत म्हैसाळमधील वनमोरे कुटुंब संपवलं
Sangli Mass Suicide : मांत्रिकाने काळ्या चहातून विष देत आरोपीने वनमोरे कुटूंब संपवलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 19 जून ही गुप्तधन मिळण्याची डेडलाईन ठरली होती.
Sangli Mass Suicide : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचे समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान (वय वर्षे 48 रा. सर्वदेनगर सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 39 रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट सोलापूर) यांना अटक केली आहे.
दरम्यान, मांत्रिकाने काळ्या चहातून विष देत आरोपीने वनमोरे कुटूंब संपवलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 19 जून ही गुप्तधन मिळण्याची डेडलाईन ठरली होती. या दिवशी गुप्तधन तुम्हाला भेटेलच असे वनमोरे कुटूंबाला भुलवून त्या मांत्रिकाने 9 जणांना वेगवेगळ्या खोलीत थांबण्यास सांगितले.
एका आरोपीला 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी
अटक करण्यात आलेल्या आरोपी धीरजला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अब्बासला अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता छातीत दुखत मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यास डिस्चार्ज मिळताच अटक करून पुढील तपास केला जाणार आहे.
लाईट बंद करून काळ्या चहातून विष दिले
त्यानंतर त्याने घरातील लाईट बंद करण्यास सांगितली. लाईट बंद केल्यानंतर त्याने सर्वांना काळ्या चहातून विष देऊन त्यांचा खून केल्याचे तपासात समोर आलं आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून हे वनमोरे बंधू या मंत्रिकाच्या संपर्कात होते. 19 जून रोजी आरोपी रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत म्हैसाळमधील वनमोरे कुटूंबाच्या घरी होते.
आधी शिक्षक असललेल्या पोपट वनमोरे, त्यांच्या पत्नी, मुलगी यांना हा काळा चहा दिला. त्यानंतर पोपट यांचा मुलगा शुभमला घेऊन पशु डॉक्टर असलेल्या माणिक वनमोरेच्या घरी आले. तिथे माणिक वनमोरे, त्यांची आई, पत्नी, दोन्ही मुले आणि शुभमला चहा देण्यात आला. रात्रभर हा कट यशस्वी केल्यानंतर हे सगळे मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपींनी पहाटे 5 वाजता म्हैसाळमधून पळ काढत सोलापूर गाठले.
चिठ्ठीचे गुपित अजूनही गुलदस्त्यात
जी चिठी पोलिसांना सापडली आहे ती नेमकी कुणी लिहिली याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. मांत्रिक अब्बास महम्मद अली बागवानकडे पोलीस खोलात जाऊन तपास करणार आहेत.