(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime: सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्स सशस्त्र दरोड्यातील आरोपींची नावे अखेर समोर आली! लवकरच अटक करु, पोलिस अधीक्षकांची माहिती
sangli crime: सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा पूर्वनियोजित आणि तांत्रिक काळजी घेऊन टाकण्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे स्थानिकांची मदत न घेता हा गुन्हा करण्यात आला आहे.
Sangli Crime: संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या रिलायन्स ज्वेलर्स सशस्त्र दरोड्यातील चार आरोपींची ओळख पटवण्यात तब्बल 15 दिवसांनी यश आलं आहे. सशस्त्र दरोड्यातील चौघांची नावे निष्पन्न झाली आहेत. हे सर्व दरोडेखोर हैदराबाद, बिहार आणि पश्चिम बंगालमधील आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने लवकरच त्यांना अटक करू, असा दावा सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी केला आहे.
रेकी करून स्थानिकांची मदत न घेता दरोडा
सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा पूर्वनियोजित आणि तांत्रिक काळजी घेऊन टाकण्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे स्थानिकांची मदत न घेता हा गुन्हा करण्यात आला आहे. यामध्ये गणेश भद्रेवार (हैदराबाद), प्रताप अशोक सिंह राणा (जिल्हा वैशाली, बिहार) कार्तिक नंदलाल मुजुमदार (पश्चिम बंगाल) आणि प्रिन्स कुमार सिंह (वैशाली, बिहार) अशी या दरोडेखोरांची नावे आहेत. या दरोडेखोरांच्या शोधासाठी एक पथक त्या राज्यात तळ ठोकून असून स्थानिक पोलीस ांच्या मदतीने लवकरच या दरोडेखोरांना अटक करू असेही तेली यानी सांगितले.
सांगलीतील दरोडा 6 कोटींचा
सांगलीत रविवारी (4 जून) भरदिवसा फिल्मीस्टाईल रिलायन्स ज्वेलर्सवर (Reliance Jewels) दरोडा पडला होता. भरदिवसा पडलेल्या या दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सांगलीतील रिलायन्स ज्वेल्समधील दरोडा हा 14 कोटी रुपयांचा नव्हे तर 6 कोटी रुपयांचा असल्याचं उघड झालं आहे. रिलायन्स ज्वेलर्सकडून चोरीला गेलेल्या रकमेबद्दल पोलिसांना पत्र लिहिलं आहे. दरोड्यानंतर ज्वेलर्समधील बंद पडलेली डिव्हीआर आणि स्कॅनिंग मशीन यंत्रणा चालू केल्यानंतर ज्वेल्समधील दागिन्याची मोजदाद करण्यात आली. यानंतर 14 कोटी रुपयांचा नव्हे तर 6 कोटी 44 लाख तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती रिलायन्स ज्वेल्सने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे. हिरे आणि सोन्याचे दागिने असलेली पिशवी पेढीतच आढळून आल्याने सहा कोटी 44 लाख 300 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे पत्रात म्हटलं आहे.
सांगली-मिरज रोडवर एक झाड रविवारी 4 जून रोजी दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचाच फायदा घेत दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला होता. यानंतर एलसीबीसह पोलिसांची पथके विविध ठिकाणी तपासासाठी रवाना झाली आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि बिहार येथेच तपासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यातही बिहारमध्ये स्थानिक पोलिसांना सूचना देत तपास सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या