Sangli News : सांगली शहरातील मोकाट कुत्र्यांचा थेट मनपा आयुक्तांनाच फटका; कार अपघातात डोक्याला दुखापत
आयुक्त गुप्ता महापालिकेच्या मोटारीने निघाले असता गव्हर्मेंट कॉलनीमध्ये रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या विजेच्या खांबाला मोटार धडकली. या अपघातात गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
सांगली : सांगली शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा फटका थेट सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनाच बसला आहे. कार अपघातात शुभम गुप्ता0 जखमी झाले असून एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काल सायंकाळी हा अपघात घडला. यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबीय व नातेवाईक होते. त्यांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Sambhaji Bhide : महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले, हिंदू समाजाला xxडू बनवत आहेत : संभाजी भिडे @NiteshNRane @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @INCMaharashtra https://t.co/8hPxilgyBo
— ABP माझा (@abpmajhatv) October 3, 2024
आयुक्त गुप्ता महापालिकेच्या मोटारीने निघाले असता गव्हर्मेंट कॉलनीमध्ये रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या विजेच्या खांबाला मोटार धडकली. या अपघातात गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांच्यासह पत्नीलाही तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधी उद्या शाहूंच्या करवीर नगरीत; तब्बल 14 वर्षांनी कोल्हापुरात अन् महिन्यात दुसऱ्यांदा पश्चिम महाराष्ट्रात! https://t.co/vjhtkyFF6h
— ABP माझा (@abpmajhatv) October 3, 2024
गाडीच्या आडवे कुत्रे आल्याने आयुक्त जखमी
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त शुभम गुप्ता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्रामबागला गेले होते. स्फूर्ती चौकातून गर्व्हमेंट कॉलनीकडे जात असताना बसथांब्याजवळ गाडीच्या आडवे कुत्रे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर आदळली. यावेळी कारमधील एअर बॅग उघडल्या, मात्र तरीही आयुक्तांच्या डोक्याला मार लागला. डोक्याला जखम झाल्याने त्यांना तातडीने मिरज रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापालिकेत अपघाताचे वृत्त धडकताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. धडकलेल्या खांबाबाबत महापालिकेत तक्रारी दाखल झाल्या आहेत. आता याच विद्युत खांबामुळे अपघातास सामोरे जावे लागले.
नारीशक्तीच्या उत्सवात नारीलाच नाकारण्यापर्यंत संभाजी भिडेंची मजल; दुर्गादेवी दौडमध्ये महिलांना नाकारले, म्हणाले बट्ट्याबोळ... https://t.co/T2wRtgQujo #Navratri #sambhajibhide
— ABP माझा (@abpmajhatv) October 3, 2024
इतर महत्वाच्या बातम्या