(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrahar Patil Meets Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गट सांगलीत दोन जागा लढणार, चंद्रहार पाटलांनी दोन्ही मतदारसंघाची नावे सांगितली!
चंद्रहार पाटील यांनी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रहार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विचारण्यात आलं असता भाष्य केले.
Chandrahar Patil Meets Sanjay Raut : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट सांगलीमधून दोन जागा लढवणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रहार पाटील यांनी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रहार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विचारण्यात आलं असता भाष्य केले. राऊत यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुद्धा भेट घेणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.
सांगलीत ठाकरे गट मिरज आणि आटपाडी या दोन जागा लढणार
चंद्रहार पाटील म्हणाले, की कोल्हापूरला जाऊन माझ्या कुस्तीतील गुरूंची भेट घेणार आहे. दरम्यान राजकीय भाष्य करताना पाटील यांनी सांगितले की, कोणत्याही मैदानात गेलो तरी काम प्रामाणिकपणे काम केल्यास यश हे नक्कीच मिळतं. सांगलीमधून शिवसेना ठाकरे गट दोन जागा लढवणार आहे. मिरज आणि आटपाडी या दोन जागा लढणार आहे.
जर पक्षाने आदेश दिला तर नक्कीच विचार करेन
लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रहार पाटील यांनी सांगलीमधून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा विशाल पाटलांसमोर दारूण पराभव झाला होता. संजय पाटील यांच्यासह तीन पाटलांच्या लढतीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जर पक्षाने आदेश दिला तर नक्कीच विचार करेन, असेही चंद्रहार पाटील यांनी सांगितले.
बाळासाहेब गुरु म्हणून फोटो लावू नये
दरम्यान, आज गुरुपौर्णिमेवरून शिंदे गटाला संजय राऊत यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, एक गुरु आयुष्यात असायला हवा. आम्हाला शहाणपण, स्वाभिमान निष्ठा याबाबत योग्य वेळी मार्गदर्शन केलं आणि नुसतं मार्गदर्शन नाही तर माणसांची घडवणूक जपणूक हे शिवसेनाप्रमुखांनी केले. म्हणून आमच्यासारखे लोक एका निष्ठेने दिसत आहेत. महाराष्ट्राचे ते गुरु होते, हिंदुत्वाचे ते गुरु होते, पण त्यातून काही नासके आंबे आहेत आणि ते बाहेर गेले. माझं त्यांना आवाहन आहे की त्यांनी बाळासाहेब गुरु म्हणून फोटो लावू नये. ते पुढे म्हणाले की, आम्ही सन्माननीय आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखतो. आम्ही जर सिनेमे काढले तर त्यांना तोंड झाकून फिरावे लागेल जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानत असतील, खोटं चित्र उभा करत असतील तर तो सन्माननीय आनं दिघेंचा अपमान आहे. बाळासाहेब यांचा देखील तो अपमान आहे.
इतर महत्वाच्या बातम्या