Sangli : देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला, पती-पत्नी जखमी; 1 लाख 96 हजारांचा मुद्देमाल लंपास
Sangli Crime News : मिरज (Miraj) तालुक्यातील कळंबीजवळील पेट्रोलपंपावर देवदर्शनासाठी निघालेले कुटुंब विश्रांतीसाठी थांबले होते. दरम्यान, चार चाकीत विश्रांती घेणाऱ्या कुटुंबावर अज्ञाताकडून दरोडा टोकण्यात आलाय.
Sangli Crime News : मिरज (Miraj) तालुक्यातील कळंबीजवळील पेट्रोलपंपावर देवदर्शनासाठी निघालेले कुटुंब विश्रांतीसाठी थांबले होते. दरम्यान, चार चाकीत विश्रांती घेणाऱ्या कुटुंबावर अज्ञाताकडून दरोडा टोकण्यात आलाय. दरोडेखोरांच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी झाले असून एक लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय. याबाबत चंद्रकांत विठ्ठलराव बावीकाडी (वय 42) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
एक लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
अधिकची माहिती अशी की, मिरज तालुक्यातील कळंबीजवळील पेट्रोलपंपावर देवदर्शनासाठी निघालेले कुटुंब विश्रांतीसाठी थांबले होते. दरम्यान, चार चाकीत विश्रांती घेणाऱ्या कुटुंबावर अज्ञाताकडून दरोडा टोकण्यात आलाय. या दरोड्यात एकूण एक लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. त्यामध्ये तीन तोळे सोने आणि 15 हजार रुपये रोख रक्कम इतका चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत चंद्रकांत विठ्ठलराव बावीकाडी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
10 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
देवदर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान (दि.23) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील कळंबीजवळ विश्रांतीसाठी त्यांची चार चाकी थांबविली. त्यामध्ये सर्व कुटुंब झोपी गेले. त्यानंतर त्या ठिकाणी आठ ते दहा जणांनी कुटुंबीयांना लुटले. फिर्यादी कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील एकूण एक लाख 69 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरला. त्यामध्ये तीन तोळे सोने व 15 हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल होता तर या दरोड्यात फिर्यादी व त्यांच्या पत्नीला दरोडेखोरांकडून चाकूने वार करण्यात आले आहेत. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात आठ ते दहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.