(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्गातील विद्यार्थ्यांचे नाव शिक्षकांना सांगितल्याने एका विद्यार्थ्यास रॉड, काठीने बेदम मारहाण, आटपाडीच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार
Sangli News: सलग दोन दिवस त्याला मारहाण होत असताना शिक्षकांना मात्र याबाबत कल्पनाच नव्हती. अखेर हा प्रकार उजेडात आल्याने खळबळ माजली आहे
सांगली : वर्गात चुका करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव शिक्षकांना सांगितल्याने एका विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याची घडना सांगली जिल्ह्यात (Sangli News) घडली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी मधील गुरुकुल निवासी वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. सलग दोन दिवस त्याला मारहाण होत असताना शिक्षकांना मात्र याबाबत कल्पनाच नव्हती. अखेर हा प्रकार उजेडात आल्याने खळबळ माजली आहे
समोर आलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये गुरुकुल निवासी विद्यालय आहे. या विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुकुल हे निवासी विद्यालय असल्याने या विद्यालयात शिकणारी विद्यार्थी हे विद्यालयाच्या वस्तीगृहात राहतात. आठवीमध्ये शिकणाऱ्या एका वर्गात दंगा आणि चुका करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे चोपडीमधील एका विद्यार्थ्याने शिक्षकांना सांगितली होती. याचा राग नावे सांगितलेल्या पाच संबंधित विद्यार्थ्यांच्या मनात होता.
सलग दोन दिवस मारहाण
विद्यालयातून वसतिगृहात गेल्यानंतर संबंधित पाच विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यार्थी राहत असलेल्या खोलीत जाऊन त्यास रॉड आणि काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या एका खोलीमध्ये नेऊन बेदम मारहाण केली. मारहाणीबाबत कोठे वाच्यता केल्यास आणखीन बेदम चोप देण्याची धमकी संबंधित पाच विद्यार्थ्यांनी चोपडी मधील त्या विद्यार्थ्याला दिली. सलग दोन दिवस मारहाण होत असताना याबाबत शिक्षकांना मात्र कल्पनाच नव्हती. अखेर शिक्षकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती दिली. पालकांनी वसतीगृहात धाव घेतल्यानंतर गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद
या मारहाणीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या हातावर, पायावर, तोंडावर, रॉडचे व्रण उठल्याचे दिसून आले. या घटनेमुळे संतापलेल्या संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी मात्र गुरुकुल मधील शिक्षकाविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात (Sangli Aatpadi Police Station) फिर्याद दिली आहे. आठवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यास रॉड आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आली आहे. सलग दोन दिवस त्याला मारहाण होत असताना शिक्षकांना मात्र याबाबत कल्पनाच नव्हती. अखेर हा प्रकार उजेडात आल्याने खळबळ माजली आहे. घटना समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. निवासी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षतीतेचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा समोर आली आहे.
हे ही वाचा :