एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चारच लोक दिसतील; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा 

Chandrashekhar Bawankule: महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांचा वेळ शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात जात होता अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 

सांगली: कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबतची साथ म्हणजे शिवसेनेच्या आणि बाळासाहेबाच्या विचाराला मूठमाती देण्याचा प्रकार हे अनेकवेळा उद्धव ठाकरेना आम्ही सांगितलं असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर अशी परिस्थिती येणार आहे की त्यांच्या स्टेजवर केवळ चारच लोक दिसतील असाही दावा त्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरेंना आमदार सोडून गेले तर उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत असा सवाल त्यांनी केला. ते सांगलीतील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा सर्व काळ हा शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी देणेघेणे नव्हते. ते बोलत नाहीत म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले तर त्यांच्या काळात उद्योजक महाराष्ट्राबाहेर का जाणार नाहीत? आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळातील चुकांमुळे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात येत आहे."

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राज्यात गुंतवणूक व्हायची असेल तर उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध हवेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री 18 महिने मंत्रालयात फिरकले नाहीत. वरिष्ठ सचिवांनाही मुख्यमंत्र्यांची भेट मिळण्यासाठी वाट पहावी लागे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व वेळ शरद पवार यांना आणि काँग्रेस पक्षाला सांभाळण्यात जात होता. त्यांनी स्वतःला बंदिस्त केले होते. ते कोणाला बोलण्यासाठी उपलब्ध नव्हते. त्यांच्या काळात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका होत नव्हत्या, उद्योगांना जागा दिली जात नव्हती, करार होत नव्हते, पर्यावरण परवानग्या दिल्या जात नव्हत्या, उद्योजकांचे शंकानिरसन केले जात नव्हते. यामुळे महाविकास आघाडी सरकारमुळे एकेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात येत आहे."

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात आली असताना त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होण्याच्या ऐवजी काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. कोल्हापूरमध्ये काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी सातारा, ठाणे, मीरा भाईंदर अशा ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांची यात्रा राज्यात असताना काँग्रेस कार्यकर्ते भाजपात का प्रवेश करत आहेत, हा त्या पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे."

भारतीय जनता पार्टीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना पाठबळ आहे आणि नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे असं सांगत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "भाजपामध्ये आम्ही सत्तेसाठी नाही तर राष्ट्रासाठी आणि विचारासाठी काम करतो. हीच पक्षातील सर्वांची भूमिका आहे. गटातटाचे राजकारण करणाऱ्यांना भाजपामध्ये स्थान नाही."

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget