एक्स्प्लोर

Sangli News : सांगली महापालिकेची कचरा डेपोवर पार पडली प्रशासकीय सभा, कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केल्याने कचरा डेपोचे रुपडेच पालटले

Sangli Municipal Corporation : आयुक्त सुनील पवार यांनी वर्षानुवर्षे कचऱ्याचा आणि कचरा डेपोमध्ये साठून असलेल्या कचऱ्याचा प्रश्न  निकाली काढला.

सांगली : सांगली, मिरज कुपवाड महापालिकेची (Sangli Municipal Corporation) प्रशासकीय सभा चक्क कचरा डेपोवर पार पडली. महापालिकेने कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया केलेल्या कचरा डेपोचे रुपडेच पालटलं आहे. यामुळे महापालिकेने आज याच कचरा डेपोवरच प्रशासकीय सभा घेत स्वच्छतेचा एकप्रकारे संदेश दिला. महानगरपालिकेने गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कचरा डेपो बाबत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सविस्तर घनकचरा प्रकल्प अहवाल तयार केला. यामध्ये आयुक्त सुनील पवार यांनी वर्षानुवर्षे कचऱ्याचा आणि कचरा डेपोमध्ये साठून असलेल्या कचऱ्याचा प्रश्न निकाली काढला. कचरा डेपोमधील कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया केल्याने बेडग रोडवरील कचरा डेपोचे रुपडेच पालटले.

14 एकरवर कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया

घनकचरा प्रकल्पातंर्गत समडोळी रोड व मिरज- बेड रोड कचरा डेपोमधील जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. या निविदेमध्ये दोन्ही डेपोमधील जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकामी पुण्यातील कृष्णा ग्रीन एनव्हायरीन सोल्युशन या कंपनीची नियुक्ती केली. एकूण एकूण 56 एकरवर हा कचरा डेपो असून यातील 14 एकरवर कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोमायनिंगव्दारे प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला. 

बायोसॉईल शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध

बेडग रोड कचरा डेपोमधील 3,13,821.413 क्यूबिक मीटर कचऱ्यावर 100 टक्के कामगिरी पूर्ण करून यातील जागा रिकामी करण्यात आली आहे. तसेच समडोळी रोड कचरा डेपोमध्ये 6,54,181 क्यूबिक मीटर कचऱ्यापैंकी 3,36,170 क्यूबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरीत कचऱ्यावर प्रक्रिया करून जागा रिकामी करण्यात येणार आहे. जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून निघणारे बायोसॉईल शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध केले जात आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संजीव ओहोळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृर्ती पाटील ,वैभव साबळे यांची उपस्थिती होती.  प्रत्यक्षात जागेवर पाहणी करण्यासाठी पत्रकार सहित सर्व उपस्थित नागरिक ,कर्मचारी अधिकारी प्रकल्पाच्या ठिकाणी उपस्थितीत होते. सर्वांनी प्रकल्पाच्या पाहणी केल्यावर समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प कार्यरत झल्याने भविष्यात कचऱ्याची कोणती समस्या निर्माण होणार नाही, यावर सर्वांनी एकमत नमूद केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GST Collection: जीएसटीनं केंद्र सरकारची तिजोरी भरली,  डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटी तिजोरीत जमा
जीएसटीनं केंद्र सरकारच्या तिजोरीत भर, डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटींचं कलेक्शन, आकडेवारी समोर
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Full Speech : उत्तर गडचिरोली नक्षलवाद मुक्त, फडणवीसांचं गडचिरोलीत भाषणVinod Kambli on Cricket : सचिन आणि मी शिवाजीपार्कवर भेटलो, मी पुन्हा येणार! क्रिकेट खेळणार!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 01 January 2025Vinod Kambli Plays Cricket : भारताची जर्सी, हातात क्रिकेट बॅट; हॉस्पिटलमध्ये कांबळीचे चौकार-षटकार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GST Collection: जीएसटीनं केंद्र सरकारची तिजोरी भरली,  डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटी तिजोरीत जमा
जीएसटीनं केंद्र सरकारच्या तिजोरीत भर, डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटींचं कलेक्शन, आकडेवारी समोर
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
Embed widget