एक्स्प्लोर

जयंत पाटलांचा लवकरच भाजपात प्रवेश होईल, तसा भाजपाच्या होकायंत्रांचा इशारा; सांगलीचे खासदार संजय पाटलांचं सूचक वक्तव्य 

Jayant Patil : सांगलीतील जयंत पाटील गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर जयंत पाटील आता काय करणार असा सवाल विचारला जात आहे. 

सांगली: भाजपा खासदार संजय पाटील यांनी एक मोठा दावा केलाय. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचा (Jayant Patil) लवकरच भाजपात प्रवेश होईल, असं वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केलंय. तसा भाजपाचा होकायंत्राचा इशारा असल्याचंही संजय पाटील म्हणाले. मिरजेमध्ये पार पडलेल्या  एका कार्यक्रमाप्रसंगी खासदार संजय पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते.

जयंत पाटील भाजपात येतील असे संकेत सांगलीचे भाजपा खासदार संजय पाटील यांनी दिले आहेत. भाजपाच्या होकायंत्रांचा इशारा असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, अशी दिशा धरुया अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांच्या गटात दाखल झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटील कुठे जाणार? चर्चा सुरू आहेत. यावरून भाजपचे खासदार संजय पाटील यांनी जयंत पाटील आता कुठे जाणार असा प्रश्न उपस्थित करताना जयंत पाटील यांचा भाजपा प्रवेश होईल, असे संकेत दिले आहेत. 

दरम्यान खासदार संजय पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. सांगलीतले लोकल नेते काही बोलले असतील तर त्यात काही तथ्य नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हे पवार साहेब यांचं कुटुंब आहे असं रोहित पवार म्हणाले. 

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत अनेक बडे नेते गेले, पण जयंत पाटील मात्र शरद पवार यांच्यासोबतच राहिले. मध्यंतरी जयंत पाटील हे अजित पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. पण त्या अफवा असल्याचं त्यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. पुण्यामध्ये उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्या भेटीवेळी त्या ठिकाणी जयंत पाटीलही उपस्थित होते. त्यानंतरही जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. 

सांगली जिल्हा हा जयंत पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्ह्यातील सत्ता स्थानांवर त्यांच्याच गटाचे सर्वाधिक प्राबल्य आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर कमी अधिक प्रमाणात सर्वच जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले, पण सांगली राष्ट्रवादीमध्ये कोणताही धक्का पोहोचलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाकडून शरद पवारांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, जेव्हा अजित पवार गटाकडून शरद पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा जयंत पाटील यांना सोबत घेऊनच चर्चा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात जयंत पाटील यांनी भेट घेतल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, जयंत पाटलांनी या सर्व चर्चांचे खंडन केले आहे.  

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget