(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli MIDC Gas Leak : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; आतापर्यंत तिघांचा मृत्यू, मालकाच्या मुलाची प्रकृतीही गंभीर
Sangli MIDC Gas Leak : सांगली एमआयडीसीत वायू गळतीमुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झालाय. उपचारादरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाला असून पाच जण आयसीयूमध्ये दाखल आहेत.
Sangli MIDC Gas Leak : सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या एक सुरक्षारक्षक आणि दोन महिलांचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी (21 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात 9 लोक अत्यावस्थ झाले होते, यातील 7 जणांना रात्री कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. अद्यापही सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 4 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
शाळगाव एमआयडीसीला आग, तिघांचा मृत्यू
म्यानमार केमिकल कंपनीत झालेल्या वायू गळतीत दोन महिलांनी जीव गमावला. सुचिता उथळे (वय 50) राहणार येतगाव, जिल्हा सांगली, तर नीलम रेठरेकर (वय 26) राहणार मसूर, जिल्हा सातारा अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावं आहेत. यासोबतच एका सुरक्षारक्षाचाही मृत्यू झाला आहे.
कंपनीच्या मालकाच्या मुलाची प्रकृतीही गंभीर
शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीत कंपनी मालकाचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. मुलावर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सूरू आहे.
हेही वाचा:
आधी स्वस्त झालं, अता मोठी वाढ! जाणून घ्या सोनं नेमकं किती रुपयांनी महागलं!