एक्स्प्लोर

Sangli Crime : पोलिसांच्या निर्भया पथकाची बोलेरो पलटी होऊनतीन पोलिस किरकोळ जखमी, दुचाकीस्वार गंभीर

Sangli Crime : आडव्या आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात मिरज पोलिसाची बोलेरो पलटी झाली. बेडग गावातील शाळांची तपासणी करून निर्भया पथक मिरजेकडे परत येत असताना हा अपघात झाला.

मिरज (जि. सांगली) : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरज तालुक्यातील (Miraj) बेडग रस्त्यावर दुचाकी आडवी आल्याने पोलिसांची (Sangli Police) निर्भया पथकाची गाडी पलटी झाली. या अपघातात तीन पोलीस किरकोळ जखमी झाले. दुचाकीस्वार या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात बोलेरो पलटी

आडव्या आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात मिरज पोलिसाची बोलेरो पलटी झाली. बेडग गावातील शाळांची तपासणी करून निर्भया पथक मिरजेकडे परत येत असताना हा अपघात झाला. दुचाकीस्वार आडवा आल्याने या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात पोलिस वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि पलटी झाले. बेडग ते आडवा रस्ता दरम्यान हा अपघात झाला. बोलेरो वाहनातील तीन पोलीस किरकोळ जखमी झाले. 

मद्यप्राशन करून दुचाकीस्वार वाहन चालवत असल्याने अपघाताचा संशय

निर्भया पथकातील एएसआय संभाजी धेंडे, अजित कोळेकर, इरवंत येमलवाड अशी जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत.  महादेव रायप्पा निवलगी (रा. मदभावी, कर्नाटक) असे दुचाकीस्वार वाहनचालकाचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. मिरज शासकीय रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघात ठिकाणी दुचाकीजवळ दारूच्या बाटल्या आढळल्या. मद्यप्राशन करून दुचाकीस्वार वाहन चालवत असल्याने अपघाताचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भरधाव वेगात दुचाकीला चिरडत एसटी झाडावर आदळली

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील (Satara ST Accident) वडूज-खटाव रोडवर जाधव वस्तीजवळ भरधाव वेगात मोटरसायकलला चिरडत एसटी (Satara accident ST bus crushed a two wheeler at high speed) झाडावर आदळली. काल रविवारी (8 ऑक्टोबर) रोजी हा अपघात घडला. या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. एसटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला. एसटी बस झाडावर आदळल्याने एसटीतील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget