Sangli Crime : इस्लामपुरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; 22 जखमी, 76 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Sangli Crime : दोन्ही गटांच्या 76 जणांविरुद्ध गंभीर दुखापतीसह एकमेकांच्या घरावर चाल करून जात नासधूस करणे आणि बेकायदा जमाव जमवून गर्दी मारामारी केल्याचे गुन्हे पोलिसांनी नोंद केले आहेत.
सांगली : सांगलीमधील (Sangli Crime) इस्लामपूर शहरातील (Islampur) माकडवाले गल्लीतील दोन गटात जुन्या भांडणाच्या रागातून तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांतील २२ जण जखमी झाले. या हाणामारीत लोखंडी गज, झांज पथकातील टाळ, काठ्या, दगड आणि विटांचा वापर करण्यात आला. परस्परांच्या घरांची नासधूस करण्यात आली. या हाणामारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दोन्ही गटांनी पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. विनोद वसंत पवार (वय 34, माकडवाले गल्ली) आणि दशरथ राजू पवार (वय 34, माकडवाले गल्ली) अशा दोघांनी फिर्यादी दिल्या आहेत. दोन्ही गटांच्या 76 जणांविरुद्ध गंभीर दुखापतीसह एकमेकांच्या घरावर चाल करून जात नासधूस करणे आणि बेकायदा जमाव जमवून गर्दी मारामारी केल्याचे गुन्हे पोलिसांनी नोंद केले आहेत.
विनोद पवारने दिलेल्या फिर्यादीत तो ओळखीच्या इतर 10 जणांसोबत घरासमोर बोलत बसला असताना प्रथमेश दिलीप कुचीवाले यानं बेकायदा गर्दी जमवून जुन्या भांडणाच्या रागातून हल्ला केला. घरांवर आणि खिडक्यांवर दगडफेक करीत नासधूस केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात विनोदसह साहिल कुचीवाले, यल्लप्पा अन्नाप्पा कुचीवाले, संदीप जाधव, राकेश जाधव, गणेश गुळके, सविता कुचिवाले, सुधीर कुचिवाले, प्रशांत कुचिवाले, पूजा कुचिकोरवी असे 10 जण जखमी झाले आहेत.
दशरथ पवारने दिलेल्या फिर्यादीत तो इतर 12 जणांसमवेत दारात बसले होते. यावेळी विनोद पवार 38 जणांचा बेकायदा जमाव घेऊन चालून आला. या सर्वांनी घरांव दगडफेक करीत नुकसान केले. या हल्ल्यात संतोषी पवार, यल्लप्पा कुचिवाले, रवींद्र कुचिवाले, सुरेश कुचिवाले, संदीप कुचिवाले, विनोद कुचिवाले, पूजा कुचिवाले, प्रमोद कुचिवाले, यल्लव्वा कुचिवाले, निकित कुचिवाले, अंकिता कुचिवाले आणि अनिकेत कुचिकोरवी असे 12 जण जखमी झाले. या दोन्ही गुन्ह्यांचा इस्लामपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी स्वतंत्रपण तपास करीत आहेत.
आईला वारंवार शिवीगाळ करत असल्याच्या रागातून लहान भावाचा खून
दरम्यान, नांद्रेत (ता.मिरज) दारु पिवून आईला वारंवार शिवीगाळ करत असल्याच्या रागातून लहान भावाचा काठीने मारहाण करुन आणि धारदार शस्त्राने वार करुन मोठ्या भावाने खून केल्याची दत्तात्रय प्रकाश कुंभार (वय 30) असे मृताचे नाव आहे. राहुल उर्फ बसवेश्वर प्रकाश कुंभार (वय 32, रा. कुंभार गल्ली, नांद्रे ) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मृत आणि संशयिताचे वडील प्रकाश यल्लाप्पा कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मृत दत्तात्रयला दारूचे व्यसन असल्याने कुटूंबीयांना त्रास देत होता. तो दारू पिवून आला की आईलाही शिवीगाळ करत असे. याच रागात राहूलला राग येत होता. याच त्रासाला कंटाळून आई-वडील दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले होते. त्याठिकाणी सुद्धा मृत दत्तात्रय शिवीगाळ करत होता.
इतर महत्वाच्या बातम्या