Sangli Crime : घरात पैसे देत नसल्याने वाद पेटला; भर दिवाळीत सख्ख्या लहान भावाकडून मोठ्या भावाचा निर्घृण खून
महेशकडे पैसे मागितल्यास भांडणे करत होता. याच पैशाच्या वादातून रविवारी रात्री पुन्हा भांडण लागले. दोघांची रस्त्यावर भांडणे लागली. या भांडणात अविनाशने महेशच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला.
शिराळा (जि. सांगली) : घरात मोठा भाऊ पैसे देत नसल्याने झालेल्या वादात सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाचा भर दिवाळीत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. शिराळा तालुक्यातील कापरीमध्ये लहान भावाने डोक्यात लाकडी दांडक्याने डोक्यात प्रहार केल्याने महेश राजेंद्र मोरे (वय 27 ) याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे (वय 22) हा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पैशाच्या वादावादीतून ही घटना घडली.
पैशातून सातत्याने वादावादी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत महेश आणि संशयित आरोपी अविनाश मोरे कापरीत आईसह लहानपनापासून आजोळी राहतात, तर वडिल गावी राहतात. मय महेशचं लग्न झालं असून तो घटस्फोटित होता. महेश आणि त्याचा भाऊ अविनाशमध्ये सातत्याने पैशावरून वादावादी होत होती. महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात सातत्याने वादावादी सुरु होती. महेशकडे पैसे मागितल्यास भांडणे करत होता. याच पैशाच्या वादातून रविवारी रात्री पुन्हा भांडण लागले. दोघांची रस्त्यावर भांडणे लागली. या भांडणात अविनाशने महेशच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. डोक्यात दणका बसल्याने महेश गंभीर जखमी झाला व खाली कोसळला. डोक्यात गंभीर मारहाण झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. महेशच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून कापरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्यार्थ्यास रॉड, काठीने बेदम मारहाण, आटपाडीच्या वसतीगृहातील धक्कादायक प्रकार
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच वर्गात चुका करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव शिक्षकांना सांगितल्याने एका विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याची घटना जिल्ह्यातील आटपाडीमधील गुरुकुल निवासी वसतिगृहात उघडकीसा आली. सलग दोन दिवस त्याला मारहाण होत असताना शिक्षकांना मात्र याबाबत कल्पनाच नव्हती.
आटपाडीमध्ये गुरुकुल निवासी विद्यालय आहे. गुरुकुल हे निवासी विद्यालय असल्याने या विद्यालयात शिकणारी विद्यार्थी हे विद्यालयाच्या वस्तीगृहात राहतात. आठवीमध्ये शिकणाऱ्या एका वर्गात दंगा आणि चुका करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे चोपडीमधील एका विद्यार्थ्याने शिक्षकांना सांगितली होती. याचा राग नावे सांगितलेल्या पाच संबंधित विद्यार्थ्यांच्या मनात होता. या पाच विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यार्थी राहत असलेल्या खोलीत जाऊन रॉड आणि काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या एका खोलीमध्ये नेऊन मारहाण केली. मारहाणीची वाच्यता केल्यास आणखी बेदम चोप देण्याची धमकी संबंधित पाच विद्यार्थ्यांनी चोपडी मधील त्या विद्यार्थ्याला दिली.
इतर महत्वाच्या बातम्या