'कुंपणाने'च खाल्ले शेत'! हत्याराच्या धाकात मालकाला लुटले, सांगलीच्या बुधगाव येथील घटना
Sab दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी हत्याराचा धाक दाखवून हातपाय बांधून व तोंडाला चिकटपट्टी लावून तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि एक लाखाची रोकड पावणे दोन कोटींचा ऐवज लंपास केला.
सांगली: आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) चोरी झालेल्या तीन किलो सोन्याची (Gold) सांगली (Sangli Crime News) एलसीबीच्या पथकाने रिकव्हरी करत तिघांना अटक केली आहे. आंध्र प्रदेशात गलाई व्यावसायिकांच्या घरावर दरोडा टाकून 1 कोटी 77 लाख रूपयांच्या सोन्यासह तिघांनी महाराष्ट्र मध्ये पलायन केले होते. सांगलीजवळील बुधगाव येथे सांगली पोलीसांनी आंध्र प्रदेश पोलीसांच्या मदतीने तिघांना अटक केली आहे.
सूरज कुंभार (वय 33, कुर्ली ता. खानापूर), कैलास शेळके (वय 30 रा. बामणी, ता. खानापूर) आणि सादीक शेख (वय 35 रा. इचलकरंजी) अशी या तिघांची नावे असून त्याना अटक करत पुढील तपासासाठी आंध्र प्रदेश पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. नामदेव देवकर यांचा वंगुरवाडी रोड, टुनुक आंध्र प्रदेश येथे गलाई व्यवसाय असून ते त्याच ठिकाणी पत्नीसह वास्तव्यास आहेत. गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुकानातील कामगार सूरज कुंभार व त्याचे साथीदारांनी घरात घुसून हत्याराचा धाक दाखवून हातपाय बांधून व तोंडाला चिकटपट्टी लावून तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि एक लाखाची रोकड असा 1 कोटी 77 लाख 81 हजाराचा ऐवज लंपास केला. तिघांनीही दरोडा टाकून फिर्यादी देवकर यांची ऑल्टो मोटार घेउन पलायन केले होते.
दरोड्यात लुटलेले सोने पिशवीत
याबाबत टुनुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संशयित सांगली जिल्ह्यात आल्याची तांत्रिक माहिती आंध्र पोलीसांना मिळाली होती.या पथकाला बुधगाव येथे एका ढाब्यावर तिघे संशयितांना आढळले. त्यांना पलायनाची संधी न देता पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता दरोड्यात लुटलेले सोने पिशवीत आढळले. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे.
शेअर मार्केटच्या नावाखाली गंडा
दामदुपट्ट परतावा आणि शेअर मार्केटच्या (Share Market) नावाखाली राज्यात फसवणुकीचा धमाकूळ सुरू असतानाच आता या यादीमध्ये चक्क ज्ञान देण्याचं काम करणाऱ्या शिक्षकाची (Primary Teacher) भर पडली आहे. शेअर मार्केटमध्ये व्यवहारासाठी कंपनी स्थापन करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपातून सांगली (Sangli News) जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ठोंबरेवाडीमधील प्राथमिक उपशिक्षक अनिल केराप्पा लांडगे यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही कारवाई केली. र्यालयीन तसेच शालेय कामकाजामध्ये अनियमतता केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, त्यामुळे निलंबनाचे आदेश काढण्यात आले.
हे ही वाचा :