एक्स्प्लोर

Sangli News: सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीतून शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर उपसाबंदी आदेश 

उद्यापासून (14 जून) उपसाबंदी आदेश लागू होणार असून तो 17 जूनपर्यंत असेल. त्यानंतर 18 ते 20 जून या कालावधीत उपसा करता येणार आहे. तसेच पर्जन्यमानानुसार व परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येणार आहे. 

Sangli News: कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग तसेच कृष्णा नदीने गाठलेल्या तळामुळे कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. कृष्णा नदीतून शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर उपसाबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. केवळ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या योजना सुरु राहणार आहेत. उद्यापासून (14 जून) उपसाबंदी आदेश लागू होणार असून तो 17 जूनपर्यंत असेल. त्यानंतर 18 ते 20 जून या कालावधीत उपसा करता येणार आहे. तसेच पर्जन्यमानानुसार व परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येणार आहे. 

वरील नमूद केलेल्या कालावधीमध्ये पिण्याचा पाणीपुरवठा सोडून इतर कारणांसाठी कृष्णा नदीतून उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे. तसेच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही पाटबंधारे विभागाच्या आदेशात म्हटले आहे. ताकारी योजना आजपासून बंद करण्यात आली आहे, तर केवळ टेंभू आणि म्हैशाळ अंशतः सुरू आहेत. 

चांदोली धरण व अभयारण्य प्रवेश पर्यटकांसाठी बंद 

दरम्यान, चांदोली धरण व अभयारण्य प्रवेश पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. चांदोली अभयारण्य, चांदोली धरण व परिसरात अतिवृष्टी असते. दरम्यान, चांदोली धरणात 11.87 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाण्यापैकी 5 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. किमान दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा धरणात सध्या उपलब्ध आहे. धरण प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे 5 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा यावर्षी शिल्लक आहे. यंदा अजूनही दमदारपणे मान्सून दाखल झाला नसल्याने आतापर्यंत केवळ 2 मिलि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. 

तर कोयना धरणात दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा 

दुसरीकडे, कोयना धरणातून पिण्यासाठी एक टीएमसी पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास कोयना धरणामध्ये केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोयनेतील पाण्याचे जपूनच नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या 1 हजार 50 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्याचा थेट परिणाम सांगली-मिरज शहरावर होत आहे. त्यामुळे सांगली महापालिकेकडूनही पाण्याचे नियोजन सुरु आहे. संपूर्ण जून महिन्यात पाणी अत्यंत जपून वापरण्याचे पाटबंधारे विभागाचे धोरण आहे. पाऊस लांबला तर अडचण होऊ शकते, या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. दुसरीकडे, चांदोली धरणात 12 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Embed widget