Sangli News : सांगलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज
सांगली (Sangli) शहरांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची (Ncp Workers) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

Sangli News : सांगली (Sangli) शहरांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची (Ncp Workers) गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. नालसाब मुल्ला असे खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. एकामागून एक आठ गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं सांगली शहर हादरुन गेलं आहे.
परिसरामध्ये तणावाचं वातावरण, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
बुलेट गाडीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर धारधार शस्त्रांनी वार करत एकाच वेळी आठ गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेनंतर हल्लेखो पसार झाले आहेत. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच, सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. या घटनेमुळं परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हत्या कोणत्या कारणामुळं करण्यात आली हे आद्यप स्पष्ट नाही
नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र, मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या घराबाहेर बसले असता अज्ञात दोघा हल्लेखोरांनी येऊन मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक आठ राऊंड फायर केले. ज्यामध्ये नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सध्या मुल्ला यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही हत्या कोणत्या कारणामुळं करण्यात आली, हे आद्यप स्पष्ट झाले नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेने सांगली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
