एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election 2024 : भाजप आमदाराला काँग्रेस-शरद पवार गटाचा जाहीर पाठिंबा, मिरज पॅटर्न पुन्हा चर्चेत, मविआची डोकेदुखी वाढली

Sangli News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मिरज पॅटर्न चर्चेत आलाय. भाजप आमदाराला काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय. यामुळे मविआची डोकेदुखी वाढली आहे.

सांगली : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मिरज पॅटर्न (Miraj Pattern) चर्चेत आलाय. कारण मिरज पॅटर्नमधील सुरेश आवटी (Suresh Awati) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी शरद पवार गटातील (NCP Sharad Pawar Group) काही माजी नगरसेवकांनी थेट विद्यमान भाजपचे आमदार सुरेश खाडे (BJP MLA Sanjay Khade) यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये विशेषतः मिरज शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय मेंढे (Sanjay Mendhe) यांचाही समावेश आहे. 

मेंढे यांच्यासह करण जामदार आणि शरद पवार गटाच्या माजी नगरसेवक यांनी देखील खाडे यांना पाठींबा दिल्याचे सांगण्यात येतेय. त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात मविआचा (Mahavikas Aghadi) उमेदवार देताना आता डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान मिरजमधील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांनी थेट भाजप आमदाराला पाठींबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर सांगली काँग्रेस, राष्ट्रवादीकडून काय कारवाई केली जातेय का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

मिरज पॅटर्न पुन्हा चर्चेत

लोकसभा निवडणुकीवेळी मिरज पॅटर्नमधल्या नेतेमंडळींनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. त्यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी लोकसभेची भूमिका वेगळी आहे, पण विधानसभेला मात्र आम्ही तुमच्या सोबतच राहू, असं सुरेश खाडे यांना सांगितलं होतं. मिरजेच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री खाडे यांचा प्रचार करणार असल्याचं माजी नगरसेवक आणि मिरज पॅटर्नमधील सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केलं आहे.

'या' नेत्यांनी दिला पाठिंबा

सुरेश खाडे यांना पाठिंबा दिलेल्यांमध्ये माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी सभापती सुरेशबापू आवटी, माजी महापौर संगीता खोत, माजी विरोधी पक्ष नेते संजयबापू मेंढे, माजी महापौर स्व. विवेक कांबळे यांचे सुपुत्र श्वेत कांबळे, करण जामदार, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने, योगेंद्र कांबळे, अतहर नायकवडी, गजेंद्र कुल्लोळी, निरंजन आवटी, गायत्री कुल्लोळी, गणेश माळी, प्रियांका पारधी, पांडुरंग कोरे, अस्मिता सलगर, शांता जाधव, संदीप आवटी यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही माजी नगरसेवकाचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीस मैनुद्दीन बागवान व संगीता हारगे हे अनुपस्थित असले तरी त्यांनी दूरध्वनीवरून सुरेश खाडे यांना संपर्क साधत जाहीर पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले आहे. 

आणखी वाचा

MP Vishal Patil : सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget