Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार? तासगाव-कवठेमहांकाळमध्ये वेगळीच चाल!
आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर पर्याय उभा करण्याचा तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात प्रयत्न सुरू करण्यात आला. तिसरी आघाडी दोन्ही कुटुंबांसाठी मात्र आगामी विधानसभेच्या तोंडावर डोकेदुखी ठरणार आहे.
![Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार? तासगाव-कवठेमहांकाळमध्ये वेगळीच चाल! In the Tasgaon Kavthemankal assembly constituency there are signs that MP Vishal Patil will take a stand against Rohit Patil Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार? तासगाव-कवठेमहांकाळमध्ये वेगळीच चाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/08/5d2275993c2db5c97641eed61284f2901725777143874736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tasgaon Kavathe Mahankal Vidhan Sabha : तासगाव कवठेमंकाळ (Tasgaon Kavathe Mahankal Vidhan Sabha) विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होण्याची चिन्हे आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होणार आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी देखील आगामी विधानसभा निवडणूकीत तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या सोबत राहण्याचे जाहीर केले आहे. लोकसभेला जसा अजित अजित घोरपडेंशिवाय पर्याय नाही तसा विधानसभेला देखील अजितराव घोरपडे शिवाय पर्याय नाही अशा शब्दात खासदार विशाल पाटलांनी अजित घोरपडे यांच्या बरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू
तासगावच्या मणेराजुरी येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते व स्वर्गीय माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल आहेत. या पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, या मतदारसंघात ही दोन्ही घराणी आता नको म्हणून तिसऱ्या आघाडीने शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून नुकतेच तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे खासदार विशाल पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर पर्याय उभा करण्याचा तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात प्रयत्न सुरू करण्यात आला. ही तिसरी आघाडी दोन्ही कुटुंबांसाठी मात्र आगामी विधानसभेच्या तोंडावर डोकेदुखी ठरणार आहे.
दोन्ही नेत्यांकडेच आतापर्यंत तालुक्याची सत्ता
राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. नुकत्याच तासगाव मध्ये झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात माजी खासदार संजय पाटील यांनी प्रभाकर पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असल्याचे सुतोवाच केले. त्यामुळे ही निवडणूक आबा - काका या परंपरागत प्रतिस्पर्धी गटातच होण्याचे संकेत आहेत. गेली अनेक वर्षे तासगाव-कवठेमहांकाळची आमदारकी स्व. आर. आर. पाटील यांच्या घरातच आहे. त्यांच्या विरोधात स्व. दिनकर (आबा) पाटील यांचा तसेच माजी खासदार संजय पाटील यांचा गट निवडणुकीत उतरत होता. अंजनी म्हणजे आर आर पाटील आणि चिंचणी म्हणजे संजयकाका पाटील या दोन्ही गावच्या नेत्यांनीच आजपर्यंत तालुक्यात आणि मतदारसंघाचे राजकारण केले आहे. दोन्ही घराणी सोडून इतर कोणालाही मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाली नाही अशी भावना आता काही नेत्यांमध्ये वाढली आहे.
मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. आर. आर. पाटील व संजय पाटील कुटुंब एकाही बेरोजगाराच्या हाताला काम देऊ शकले नाहीत असा आरोप आता होत आहे. मतदारसंघात एकही औद्योगिक वसाहत, सहकारी संस्था, बँक अथवा मोठे व्यवसाय नाहीत. संस्था, बँक अथवा अन्य मोठे उद्योग उभारण्यात हे दोन्हीही नेते अपयशी ठरले आहेत अशी टीका आता होत आहे. त्यामुळे तासगाव कवठेमहांकाळ सत्ता या दोन्ही कुटुंबांपासून हस्तगत करण्यासाठी तिसऱ्या आघाडीने कंबर कसली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)