Sangli News : रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीच्या मैदानात पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा सन्मान
Sangli News : काही दिवसापूर्वीच पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेल्या प्रतीक्षा बागडीचा सन्मान विटाजवळील भाळवणीत पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीच्या मैदानात करण्यात आला.
Hasan Mushrif : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनकडून आयोजित करण्यात रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीच्या मैदानात पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा सन्मान करण्यात आला. यामुळे बैलगाडी शर्यतीच्या मैदानातही कुस्तीचा बोलबाला कायम ठेवत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आपले कुस्तीवरील प्रेम कायम असल्याचे दाखवून दिले. काही दिवसापूर्वीच पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेल्या प्रतीक्षा बागडीचा सन्मान विटाजवळील भाळवणीत पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीच्या मैदानात करण्यात आला. एक लाख रुपये आणि चांदीची गदा देऊन पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडीचा रुस्तम-ए-हिंद बैलगाडी मैदानात सत्कार करण्यात आला.
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील युथ फौंडेशन आणि जोगेश्वरी उद्योग समूह पुणे, प्रविणशेठ जाधव, राजारामशेठ जाधव, पोसेवाडी यांचेतर्फे एक लाख रुपये आणि चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, आमदार निलेशजी लंके, आमदार अरुण अण्णा लाड, विजय जाधव पोसेवाडी यांच्या हस्ते एक लाख रुपये आणि चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला.
बकासूर-महिब्यानं मैदान मारलं
दरम्यान, भाळवणीत देशातील सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत पार पडली. या शर्यतीत पुण्याच्या मुळशीमधील बकासूर आणि कराडच्या रेठरेमधील महीब्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला. या बैलजोडीला थार गाडी भेट देण्यात आली. लाखो बैलगाडी शौकिनांच्या उपस्थितीत भाळवणीत बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अशा या बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रभरातील 2 लाखांच्या आसपास बैलगाडा शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती. सुमारे 10 एकर परिसरातील माळरानावर ऐतिहासिक बैलगाडी स्पर्धा पार पडल्या. ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, मुंबई आणि कर्नाटक राज्यातून सुमारे 200 बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले होते.
शर्यत मैदानासाठी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार निलेश लंके, माजी आमदार पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदि मान्यवरांनीही उपस्थितीत लावली होती.
महत्वाच्या इतर बातम्या :