Sangli News : एसटी चालवताना चालकाला आली चक्कर; वाहकाने स्टेअरिंग हाती घेत 30 जणांचा जीव वाचवला!
Sangli News : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आणून देणारी घटना सांगली जिल्ह्यात घडली. खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ एसटी बस चालवत असतानाच बस चालकाला अचानक चक्कर आली.
Sangli News : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आणून देणारी घटना सांगली जिल्ह्यात घडली. खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ एसटी बस चालवत असतानाच बस चालकाला अचानक चक्कर आली. शेजारीच असणाऱ्या वाहकाने प्रसांगवधान राखत बसचे स्टेअरिंग आपल्या हातात घेत बस कंट्रोल केली. त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचले आहेत.
परळी-चिपळूण ही बस प्रवाशी घेवून भिवघाटमार्गे विट्याकडे येत होती. परंतु, ती येत असतानाच चालकाला अचानक चक्कर आली. अचानक असे काय झाले म्हणून बसमधील सर्व प्रवाशी भयभीत झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरने बसचा ताबा घेतला आणि बस बाजूला घेतली. त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचले. तत्काळ त्याच अवस्थेत बस चालवत भिवघाट येथे आणण्यात आली. सदर चालकावर त्वरित उपचार करण्यात आले. सध्या चालक सुखरुप असून या घडलेल्या घटनेने मात्र प्रवाशांची मोठी भंबेरी उडाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या