एक्स्प्लोर

Amit Deshmukh on Jayant Patil : त्यामुळे इस्लामपुरात न येऊन पंचाईत करून घेणार नाही! जयंत पाटलांच्या उपस्थितीत अमित देशमुखांची 'भावी' राजकारणाची फटकेबाजी!

Amit Deshmukh on Jayant Patil : माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh on Satej Patil) यांनी इस्लामपूरमध्ये वडील विलासरावांच्या शैलीमध्ये चांगलीच राजकीय फटकेबाजी केली.

Amit Deshmukh on Jayant Patil : माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh on Satej Patil) यांनी इस्लामपूरमध्ये वडील विलासरावांची आठवण येईल या शैलीमध्ये चांगलीच राजकीय फटकेबाजी केली. इस्लामपुरात भावी काळाची चर्चा होत असताना इस्लामपुरात न येणं म्हणजे आम्ही आमची पंचाईत करून घेऊ, असे सांगत अमित देशमुख यांनी जयंत पाटलांच्या (Jayant Patil) मुख्यमंत्रिपदावरून भाष्य केले. जी इच्छा इस्लामपूरकरांच्या मनात आहे तीच लातूरकरांच्या मनात असल्याचे ते म्हणाले. 

जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांची आज (17 फेब्रुवारी) राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अमित देशमुख यांनी यावेळी प्रतिक पाटील यांचेही कौतुक केले. इस्लामपूर बिझनेस फोरमतर्फे 'आयबीएफ-एक्सपो या व्यावसायिक प्रदर्शनाचे अमित देशमुख आणि जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात देशमुख बोलत होते.

देशमुख आणि पाटील कुटुंबाचे पिढ्यांचे संबंध

अमित देशमुख म्हणाले की, इस्लामपूर आणि राज्यामध्ये सध्या भावी काळाची चर्चा सुरू आहे आणि ते आमच्या कानावर आलं आहे. ही भावी काळाची चर्चा ज्या इस्लामपुरातमध्ये होते त्या ठिकाणी न येऊन आम्ही आमची पंचाईत करून घेणार नाही. देशमुख आणि पाटील कुटुंबाचे पिढ्यांचे संबंध आहेत. राजारामबापू पाटलांना पाहून विलासरावांनी राजकीय प्रवास सुरु केला. हे नातं अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आलो आहे. जयंत पाटील यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करत त्यांना शुभेच्छा देतो, असेही अमित देशमुख म्हणाले. 

अमित देशमुख यांनी प्रतिक पाटील यांच्या निवडीवरून आनंद असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ही निवड योग्य असून सहकारातील नेतृत्व तरुणाईकडे सुपूर्द केलं जात आहे याचा आनंद आहे. प्रतिक आणि राजवर्धनला जवळून पाहत आहे. थिंक ग्लोबल आणि अॅक्ट लोकल याची अनुभूती होते. पुण्यातील पोटनिवडणुकीचा निकाल हा दिशा देणारा असेल. मागील काही दिवसांमध्ये जे काही घडलं आहे ते सामान्यांना पटलेलं नाही, असेही अमित देशमुख यांनी सांगितले. 

राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतिक पाटील   

दरम्यान, इस्लामपुरातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतिक जयंत पाटील (Prateek Jayant Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे, जयंत पाटील यांनीही 1984 साली याच कारखान्याच्या संचालकपदापासून राजकीय जीवनाची सुरूवात केली होती. आता प्रतिक पाटील हे देखील पहिल्यांदाच साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यूEknath Shinde on School Uniforms :रोहित क्वालिटी बघ म्हणत, शिंदेंनी सभागृहात शाळेचा युनिफॉर्म दाखवलाMaharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषदेचं गणित काय? मतांचा कोटा, कुणाला घाटा?Hathras Stampede : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 50 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी; हाथरसमधील घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget