(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लवकरच सांगलीचा तिढा सोडवू, विशाल पाटलांची बंडखोरी थांबवू, बाळासाहेब थोरातांचं मोठं वक्तव्य
Sangli loksabha Election : सांगली लोकसभेचा तिढा लवकरच सोडवू, विशाल पाटलांची (Vishal Patil) बंडखोरी थांबवू असं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं.
Balasaheb Thorat on Sangli loksabha : महाविकास आघाडीला राज्यभर चांगलं वातावरण आहे. त्यामुळं या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) आम्हाला घवघवीत यश मिळेल असं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं आहे. दरम्यान, सांगलीचा तिढा देखील आम्ही लवकर सोडवू. तसेच विशाल पाटलांची (Vishal Patil) बंडखोरी थांबवू असं वक्तव्य थोरात यांनी केलं आहे. त्यामुळं विशाल पाटील आता माघार घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ही ठाकरे गटाला देण्यात आली आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. मात्र, यावरुन सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. कारण सांगली हा काँग्रेसचा पारंपारीक मतदारसंघ आहे. त्यामुळं ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, जागा ठाकरे गटाला सुटली आहे. त्यामुळं वादंग निर्माण झालं आहे.
विशाल पाटील लढण्यावर ठाम
दरम्यान, सांगली लोकसभेची जागा लढण्यावर विशाल पाटील हे ठाम आहेत. काणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा पवित्रा विशाल पाटलांनी घेतला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. काँग्रेस आपल्यालाच उमेदवारी देईल असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. मात्र, ही जागाठाकरे गटाला सुटलेली आहे. त्यामुळं यामध्ये कोमताही बदल होमार नसल्याची भूमिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळं पैलवान चंद्राहार पाटील यांचीच उमेदवारी कायम राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन वादंग निर्माण झालं आहे. काँग्रेसला कोणत्याही प्रकारे विचारात न घेता ठाकरे गटानं आपला उमेदवार जाहीर केल्याची टीका सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी केली होती. सांगलीची जागा ही पारंपारीक काँग्रेसची आहे. त्यामुळं आम्ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सांगली काँग्रेसच्या नेत्यांनी दिली होती. दरम्यान, विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून आमदार विश्वजीत कदम यांनी मोठे प्रयत्न केले होते. विशाल पाटलांसह ते दिल्लीत देखील नेत्यांना भेटायला गेले होते.
महत्वाच्या बातम्या: