Sangli News : श्री शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी बंदची हाक; संभाजी भिडेंकडून घोषणा
संभाजी भिडे म्हणाले की, बांगलादेशमधील नंगानाच तत्काळ थांबवायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. बांगलादेशमधील हिंदू लोकांचे स्थलांतर अजिबात होता कामा नये.

Sangli News : बांगलादेशात अत्याचार होत आहे. बांगलादेश हिंदुवरील अत्याचार तत्काळ थांबला पाहिजेय. हिंदुस्तानमध्ये याची संतप्त प्रतिक्रिया उमटत नाहीय. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळणार असल्याची घोषणा संभाजी भिडे यांनी केली. संभाजी भिडे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्राने सुद्धा बंद पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
मराठ्यांनी आरक्षण का मागावं? संभाजी भिडे यांचा सवाल, मराठ्यांनी देश चालवायचा सोडून आरक्षण मागतायत https://t.co/z74sEdzKEb #sambhajibhide #marathareservation
— ABP माझा (@abpmajhatv) August 18, 2024
बांगलादेशमधील हिंदू लोकांचे स्थलांतर अजिबात होता कामा नये
संभाजी भिडे म्हणाले की, बांगलादेशमधील नंगानाच तत्काळ थांबवायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. बांगलादेशमधील हिंदू लोकांचे स्थलांतर अजिबात होता कामा नये. त्यांना बांगलादेशमध्ये सुरक्षा मिळायला हवी. सगळ्या हिंदू राजकारण्यांनी या गोष्टी घडल्यानंतर पेटून उठायला हवं असेही ते म्हणाले. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरुन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली तीच आमची भूमिका असल्याचे संभाजी भिडे म्हणाले. देशांमध्ये बलात्कार हा किळसवाणा प्रकार झाला आहे. अत्याचार थांबायला हवा. कोणत्याही स्त्रीवर होणारा बलात्कारा म्हणजे मातेवरचा बलात्कार असल्याचे संभाजी भिडे म्हणाले. दरम्यान, संभाजी भिडे यांनी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले.
मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठले काढले. मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे. हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. मात्र हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे, असे संभाजी भिडे म्हणाले. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठून काढलंय, असंही भिडे म्हणालेत. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
