एक्स्प्लोर

Miraj Accident: चार ऊसतोड कामगारांवर काळाचा घाला, मिरज सोलापूर हायवेवर भीषण अपघात, दहा जण गंभीर

Miraj Accident: ऊसतोडणीचं काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकनं धडक दिली. तालुक्यातील ऊसतोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला.

Miraj Accident Nrews: सोलापूरमिरजेत भीषण अपघात झाला असून अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहाजण गंभीर जखमी आहेत. ऊसतोडणीचं काम संपवून घराकडे परतत काही मजुरांना ट्रकनं धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

ऊसतोडणीचं काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकनं धडक दिली. तालुक्यातील ऊसतोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला. तर तब्बल 10 जण जखमी झाले आहेत. मृतांमधील तीनजण चिखलगीचे, तर एकजण शिरनांदगीचा रहिवाशी आहे. 

सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेतील सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो. त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावं लागतं, येथील काही ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून काही मजूर गावाकडे परतत होते. त्यावेळी मध्यरात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला, त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करुन दुरुस्त केला जात होता. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या आंध्रप्रदेशातील ट्रकनं मागू येऊन धडक दिली. 

मृतांमध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय 30 रा. शिरनांदगी, जगमा तम्मा हेगडे वय 35, दादा आप्पा ऐवळे वय 17, निलाबाई परशुराम ऐवळे वय 3 रा. चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला आणि 11 जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ आणि मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले.या अपघाताची वृत्त समजतात चिक्कलगी किंवा शिरनांदगी या गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं? 

ऊसतोडणीचं काम संपवून घराकडे परतणारे मजूर ट्रॅक्टरनं आपापल्या घरी परतत होते. ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यानं ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करुन चालक तो दुरुस्त करत होता. तेवढ्यात पाठीमागून एका ट्रकनं भरधाव वेगात येऊन धडक दिली. या अपघातात तब्बल चार उसतोड मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दहाजण गंभीर जखमी झाले आहेत. 

सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान घडली. मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचं साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊसतोडणीचा पर्याय निवडावा लागतो, त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावं लागतं. येथील काही ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री रात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता, तेवढ्यात पाठीमागून आलेल्या आंध्रप्रदेशातील ट्रकनं धडक दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Embed widget