(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime : सांगलीत 28 वर्षीय नराधमाकडून नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ब्ल्यू फिल्म दाखवून अत्याचार
Sangli Crime : ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : राज्यात चिमुरड्या मुलीवरील अत्याचाराची मालिका सुरुच असून आता सांगलीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील संजयनगर भागात एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना समोर आली आहे. 28 वर्षीय नराधमाने 9 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आहे. ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर
दुसरीकडे, आटपाडीमध्ये काही दिवसांपूर्वी एका जीम चालकाकडून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. आरोपी सध्या जेलमध्ये असतानाच या अल्पवयीन मुलीवर चार दिवसांपूर्वी तीन अज्ञातांकडून कटरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही. मात्र मुलीच्या अंगावरील कपडे या हल्ल्यात फाटले. मुलगी भांडी घासत असताना मुलीवर हल्ला करून हल्लेखोर फरार झाल्याची मुलीच्या कुटुबीयांनी तक्रार दिली आहे.
घटनास्थळी पीडितेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले कटर पोलिसांना सापडले. आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करत हल्ल्यात वापरलेला कटर ताब्यात घेतलं आहे. मात्र, पीडितेवर हल्ला नेमका कोणी केला ? व कशासाठी केला याचा अद्याप तपास लागला नाही.
नेमकं काय आहे प्रकरण?
आटपाडी तालुक्यात मागील गेल्या काही दिवसांपूर्वी एका जिम चालक व खाजगी परिचारिकेने एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती गाडीत बसवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याबाबत आरोपी जिम चालक संग्राम देशमुख व परिचारिका सुमित्रा लेंगरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
तरुणीकडून मैत्रिणीची चाकूने भोसकून हत्या
दरम्यान, गेल्या 48 तासात अमरावतीमध्ये तीन तरुणांचा निर्घृण खुनांची मालिकाच झाली असतानाच आता बाॅयफ्रेंडच्या वादातून एका तरुणीने मैत्रिणीला चाकून भोसकून खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. तो माझाच आहे तुझ्यामुळे दुरावा निर्माण झाला असा समज करून घेत अमरावती शहरातील एका तरुणीने आर्वीमधील युवतीला चाकूने भोसकले. ही भयंकर घटना मंगळवार रात्री साडेआठच्या सुमारास दस्तूरनगर सुपर एक्सप्रेस हायवेवर घडली. मैत्रीण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंत तरुण आणि तिचा मित्र फरार झाले आहेत. पोलिलांनी दिलेल्या माहितीनुसार शुभांगी (वय 26 रा. आर्वी जि. वर्धा) असे मृत तरुणीचे नाव आहे.
इतर महत्वाच्या बातम्या