crime news: अज्ञात इसमाला दगडाने ठेचून संपवलं, नगर मनमाड महामार्गाजवळ मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ
ही घटना स्वराज ट्रॅक्टर शोरूमजवळील एका मोकळ्या प्लॉटमध्ये घडली आहे. सकाळी परिसरातील नागरिकांना मृतदेह आढळून आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
Ahmednagar crime: राज्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून भर दिवसा हत्या, अपहरण, गुंडगिरी, दगडाने ठेचून खून, लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलींचा छळ अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान,अहिल्यानगर जिल्ह्यात नगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाट्याजवळ दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरात एका 36 वर्षीय व्यक्तीचा अज्ञात इसमाने दगडाने ठेचून खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी ही घटना समोर आली असून, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयत व्यक्तीचे नाव अश्विन मारुती कांबळे असे आहे. (Crime news)
दगडाने ठेचून हत्या, तपास सुरु
ही घटना स्वराज ट्रॅक्टर शोरूमजवळील एका मोकळ्या प्लॉटमध्ये घडली आहे. सकाळी परिसरातील नागरिकांना मृतदेह आढळून आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. खुनासाठी वापरण्यात आलेल्या दगडाचा तपास सुरू असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.खुनामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, पोलीस विविध दिशांनी तपास करत असून, अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करत आहेत. घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
पुण्यातील कुटुंबाला रक्तबंबाळ होईस्तोवर मारहाण
पुण्यात क्षुल्लक कारणावरून मारहाण, हल्ले, गोळीबार या घटना मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अशातच पुण्यातील (Pune News) मुंढवा भागात वाहतुकीच्या दरम्यान एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवल्यामुळे घडला असून, हल्लेखोरांनी फायटरने वार करत हल्ला केला. या घटनेने पुण्यातील (Pune News) नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. ट्रॅफिकमध्ये असताना हॉर्न का वाजवला म्हणून दोन जणांनी मारहाण करत गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी तात्काळ दोघां जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार
जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत असून आता भुसावळमध्ये (Bhusawal Firing) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खडका रोड परिसरात एका तरुणाची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. तहरीन शेख असे या मृताचे नाव आहे. या घटनेमुळे भुसावळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: