Samruddhi Highway Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव कार ट्रकवर आदळली, एक जण जागीच ठार, दोघे गंभीर
Samruddhi Highway Accident : समृध्दी महामार्गावर (Samriddhi Highway) पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात देव-दर्शनासाठी जात असताना भरधाव फॉर्च्यूनर कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली आहे.

Samruddhi Highway Accident : समृध्दी महामार्गावर (Samriddhi Highway) पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात देव-दर्शनासाठी जात असताना भरधाव फॉर्च्यूनर कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघाताच्या घटनेत एक जण ठार झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहे. नागपूरवरुन शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात असणाऱ्या भविकांवर काळाने घाला घातला आहे. प्रवासादरम्यान वाशिम (Washim) नजीकच्या हद्दीत लोकेशन 207 वर हा अपघात झालाय.
एक जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी
पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूरवरून शनि शिंगणापूरला दर्शनासाठी जात जात असताना वेगात असलेल्या फॉर्च्यूनर कारने चालत्या ट्रकला मागून धडक दिलीय. ही धडक इतकी जबरदस्त होती की, एक जण जागीच ठार झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. हे तिघे नागपूर येथील असल्याची माहिती पुढे आली आहे. तर जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमरावती नागपूर महामार्गवरील दोन वाहनाचा विचित्र अपघात
दरम्यान, अशीच एक अपघाताची घटना अमरावती नागपूर महामार्गवरील बिझीलँड जवळ घडली आहे. या विचित्र अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नसल्याची माहित आहे. अमरावती शहराच्या बाहेर नागपूर महामार्गावरील बिझीलँड कापड केंद्राजवळ आज (26 एप्रिल) सकाळी 11.30 वाजता पुलाजवळ दोन वाहनाची जोरदार टक्कर झाली. यात छोट्या वाहनाचं मोठं नुकसान झालंय. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बिअर उधार न दिल्याने शॉपीला लावली आग, घटना CCTV मध्ये कैद
बियर उधार न दिल्याने एका तरुणाने चक्क बियर शॉपी पेटून दिली. ही घटना पुसद शहराच्या शिवाजी वॉर्डात घडली. या बाबतचा सीसीटीव्ही व्हिडिओ कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पुसद बसस्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या स्नेहल बियर शॉपीमध्ये एका तरुणाने उधारीमध्ये बियर मागितली असता शॉपि मालकाने उधार देण्यास मनाई केली. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने रात्रीच्या सुमारास दुकानात ज्वलनशील पदार्थ टाकून त्या दुकानाला पेटून दिले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. त्यावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले.
हे ही वाचा
























