Virat Kohli : विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये झळकणार Ram Charan? अभिनेता म्हणाला, मी त्याच्यासारखाच दिसतो
Virat Kohli : क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये झळकण्याची इच्छा राम चरणने व्यक्त केली आहे.
Ram Charan On Virat Kohli Biopic : भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू विराट कोहलीचं (Virat Kohli) नाव देशासह जगभरात चर्चेत आहे. आता विराट कोहलीवर बायोपिक येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. नुकतचं एका मुलाखतीत दाक्षिणात्य अभिनेता राम चरणने (Ram Charan) विराट कोहलीच्या भूमिकेत झळकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मी विराट कोहलीसारखाच दिसतो : राम चरण
राम चरण एका मुलाखतीत म्हणाला,"आता मला क्रीडाविषयक सिनेमा करायचा आहे. मला विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये त्याची भूमिका साकारायला आवडेल. विराटचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यामुळे मला जर या सिनेमासाठी विचारणा झाली तर मी लगेचच होकार देईल. मिळालेल्या संधीचं सोनं करेल. मीदेखील त्याच्यासारखाच दिसतो".
राम चरणने इच्छा व्यक्त केली असली तरी विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये कोण झळकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चाहतेदेखील विराटच्या भूमिकेत राम चरणला पाहायला उत्सुक आहेत. ऑस्करनंतर राम चरण आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे.
राम चरणचे आगामी सिनेमे (Ram Charan Upcoming Project)
राम चरणचा 'आरआरआर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो 'RC15' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. हा सिनेमा जानेवारी 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सिनेमात राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' या आगामी सिनेमातदेखील राम चरणची झलक पाहायला मिळणार आहे.
हॉलिवूडच्या सिनेमात राम चरण हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीटसोबत स्क्रीन शेअर करु शकतो. तसेच टॉम क्रूझ, ज्युलिया रॉबर्ट्स आणि ब्रॅड पिट यांच्यासोबत काम करण्याची इच्छा राम चरणने व्यक्त केली आहे.
भारतात येण्याआधी अमेरिकेतदेखील एका मुलाखतीत राम चरणने हॉलिवूड सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच 'आरआरआर'नंतर आणखी एक मोठा प्रोजेक्ट हातात असल्याबद्दल भाष्य केलं होतं. भारतात आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर राम आता जगभरातील चाहत्यांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल.
संबंधित बातम्या