एक्स्प्लोर
'तुझे मेरी कसम' चित्रपटाला 17 वर्ष पूर्ण, रितेश-जेनेलियाची बाभळगावातून टिकटॉकवर धूम
तुझे मेरी कसम सिनेमाने या दोघांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यामुळे या सिनेमाच्या 17 व्या वर्षपूर्तीचं सेलिब्रेशन लातूरमध्ये केलं आहे. रितेश आणि जेनेलियानं या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
लातूर : बॉलिवूड चित्रपट जगतात रितेश देशमुख आणि जेनेलियाची जोडी तुफान लोकप्रिय आहे. त्यांची ऑन स्क्रिन जोडी तसेच ऑफ स्क्रिन जोडी कायमच चर्चेचा विषय राहिली आहे. या दोघांचा पहिला चित्रपट तुझे मेरी कसम हा 3 जानेवारी 2003 साली प्रदर्शित झाला होता.त्यांचे प्रेम प्रकरण 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या सेट वरच फुलले होते. त्यानंतर त्यांनी लग्न गाठ बांधली. आज ही ते बॉलिवूड मधील सर्वात हॉट कपल आहे. त्याचीच आठवण ताजी करत जेनेलिया आणि रितेशने टिकटॉक वर दोन व्हिडीओ शेयर केले आहेत. जे लातुरात त्याच्या शेतात चित्रित करण्यात आले होते. हे दोन व्हिडीओ शेयर करताच अवघ्या काही तासातच लाखो लोकांनी ते पाहात त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
रितेश आणि जेनेलिया दोघेही सोशल माध्यमावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. तुझे मेरी कसम सिनेमाने या दोघांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यामुळे या सिनेमाच्या 17 व्या वर्षपूर्तीचं सेलिब्रेशन लातूरमध्ये केलं आहे. रितेश आणि जेनेलियानं या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची अजूनही बाजारात पायरेटेड कॉपी मिळत नाही. या सिनेमाच्या वेळी रितेशचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या सिनेमाला महाराष्ट्रासह देशाभरात सिनेरसिकांनी डोक्यावर घेतले होते.
हा चित्रपट प्रचंड गाजला आणि रितेशला अभिनेता म्हणून ओळख मिळाली. या सिनेमाची निर्मिती रामोजी राव यांनी केली. तसा तुझे मेरी कसम हा सिनेमा नुव्वे कावाली या तेलगू या सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमात तरुणकुमार आणि रिचा पल्लोड यांनी अभिनय केला होता. नुव्वे कावालीसाठी अभिनेत्री रिचा पल्लोडला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
या सिनेमाचे संपूर्ण शूटिंग रामोजी फिल्मसिटीमध्ये झाले होते. रितेशने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात देखील आपल्या बाभळगावातील शेतातूनच केली होती. शेतातील कुटुंबासह फोटो त्याने शेअर केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement