Republic Day 2021 Parade : दिल्लीतील पथ संचलनात जळगावच्या समृद्धी संतकडे देशातील महिलांच्या नेतृत्वाची धुरा
संपूर्ण भारतातून या पथसंचलनात सहभागी झालेल्या 100 एनसीसीच्या तुकडीचे नेतृत्व समृद्धी संत करणार आहे.
जळगाव : 26 जानेवारी निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले असते. या परेडमध्ये सहभागी होण्याचे अनेकांच् स्वप्न असते. केवळ या परेड मध्ये सहभागी होण्याचं स्वप्न जळगावच्या समृद्धी हर्षल संत या तरुणीने पूर्ण केले. संपूर्ण भारतातून या पथसंचलनात सहभागी झालेल्या 100 एनसीसीच्या तुकडीचे समृद्धी नेतृत्व करत आहे.
समृद्धी संत जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यायची विद्यार्थिनी आहे. लहानपणापासून तिला एनसीसी आणि देशासाठी काम करायचे होते. समृद्धीची ही कामगिरी महाराष्ट्रातील मराठी तरुणीं साठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. उद्या 26 जानेवारीच्या होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी समृद्धी ही गेल्या दोन महिन्या पासून कसून सराव करत आहे.
प्रजासत्ताक दिन म्हटलं की आपल्याला राजपथावरचं संचलन आठवतं. पण उद्या देशाचे जवान आणि किसान दोघेही राजधानी दिल्लीत परेड करताना दिसतील. जवानांसोबत रणगाडे तर शेतकऱ्यांसोबत असेल त्यांचा शेतातला साथीदार ट्रॅक्टर. दिल्लीच्या चार सीमांवर जिथे आंदोलन सुरु आहे त्या चारही सीमांवरुन उद्या हे ट्रॅक्टर दिल्लीत बाहेर पडतील. 26 जानेवारीची परेड संपली की ही परेड सुरू होईल. पोलिसांचा दावा 30 हजार ट्रॅक्टर असतील तर शेतकऱ्यांचा दावा अडीच लाख ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याचा आहे.
यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर महाराष्ट्रातल्या संत परंपरेवर आधारित चित्ररथ असणार आहे. चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महारांजाची 8 फुटांची आसनस्थ मूर्ती आहे. त्यांच्या मुर्ती समोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी 8 फुट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत. या पाठोपाठ राज्यातील संतांचे व कोटयावधी भक्तांचे दैवत असणा-या पांडुरंगाची कटेवर हात असणारी 8.5 फुट उंचीची लोभस मूर्ती उभारण्यात आली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फुट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहण्यात आली आहेत. या सर्व पुतळयांची बांधणी पूर्ण झाली असून त्यावर रंग काम सुरु आहे.
संबंधित बातम्या :