Ashadhi Wari 2023 : गजाजन महाराज आणि रुक्मिणी मातेची पालखी आज हिंगोलीत, कण्हेरगावात रुक्मिणी मातेच्या पालखीचा मुक्काम
गण गण गणात बोतेच्या गजरात आज संत गजानन महाराजांची पालखी हिंगोलीत पोहोचली आहे. तर रुक्मिणी मातेची पालखीही कण्हेरगावात मुक्कामी असेल.
मुंबई: रुक्मिणी मातेची पालखी आज वाशिमवरुन प्रस्थान होऊन हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करत असून आज पालखी कण्हेरगाव नाका या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. तर शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आज हिंगोलीमध्ये पोहोचली आहे.
विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे (Rukmini Mata) माहेर अशी श्रीक्षेत्र कोंडण्यपूरची ओळख आहे. या ठिकाणाहून श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूर वारी 23 मे रोजी प्रस्थान झाली आहे. आई रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा 428 वर्षांपासून सुरु आहे. संत सदाराम महाराजांनी 1594 साली या वारीला प्रारंभ केला होता. वारीचे हे 429 वे वर्ष आहे. आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केलं जाते. 25 जून रोजी ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.
गण गण गणात बोते आणि विठ्ठल नामाच्या गजर करत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे. गजानन महाराजांच्या पालखीचं हे 54 वं वर्ष आहे. साडेसातशे वारकरी 550 किलोमीटरचा पायी प्रवास एका महिन्यात पूर्ण करून आषाढी एकादशीला पंढरीत पोहोचतात. पांढरीशुभ्र कपडे, हातात भगवा झेंडा आणि शिस्तीत चालणारे वारकरी हे या वारीचे वेगळेपण असतं.
आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून (Maharashtra) 43 पालख्या पंढरपुरात (Pandhapur) दाखल होतात. या पालख्यांमध्ये तुकोबारायांची पालखी, माऊलींची पालखी, गजानन महाराजांची पालखी, सोपानकाकांची पालखी, मुक्ताईंची पालखी या पालख्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरतात.
रुक्मिणीच्या पालखीचा प्रस्थान कार्यक्रम पुढीलप्रमाणे,
दि. 6 जून सकाळी रेनॉल्ड हॉस्पिटल, जि. वाशीम येथून प्रस्थान - रात्री कण्हेरगाव नाका, जि. हिंगोली येथे मुक्काम
दि. 7 जून सकाळी कण्हेरगाव नाका, जि. हिंगोली येथून प्रस्थान - रात्री मु.पो. भांडेगाव, जि. हिंगोली येथे मुक्काम
दि. 8 जून सकाळी मु.पो. भांडेगाव, जि. हिंगोली येथून प्रस्थान - रात्री पोस्ट ऑफिस रोड, जैन मंदिर, जि. हिंगोली येथे मुक्काम
दि. 9 जून सकाळी पोस्ट ऑफिस रोड, जैन मंदिर, जि. हिंगोली येथून प्रस्थान - रात्री नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथे मुक्काम
दि. 10 जून सकाळी नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथून प्रस्थान - रात्री श्री. हटकेश्वर देवस्थान, जिल्हा हिंगोली येथे मुक्काम
दि. 11 जून सकाळी श्री. हटकेश्वर देवस्थान, जिल्हा हिंगोली येथून प्रस्थान - रात्री रोडकेश्वर मंदिर संस्थान, जिल्हा परभणी येथे मुक्काम
दि. 12 जून सकाळी रोडकेश्वर मंदिर संस्थान, जिल्हा परभणी येथून प्रस्थान - रात्री मु.पो. दैठना, जिल्हा परभणी येथे मुक्काम
दि. 13 जून सकाळी मु.पो. दैठना, जिल्हा परभणी येथून प्रस्थान - रात्री संत जनाबाई मठ, गोदातट येथे मुक्काम
दि. 14 जून सकाळी संत जनाबाई मठ, गोदातट येथून प्रस्थान - रात्री नेहरू चौक, परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे मुक्काम
दि. 15 जून सकाळी नेहरू चौक, परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथून प्रस्थान - रात्री काळा मारोती संस्थान, अंबेजोगाई येथे मुक्काम
दि. 16 जून सकाळी काळा मारोती संस्थान, अंबेजोगाई येथून प्रस्थान - रात्री पळसखेड, ता. केज, जि. बीड येथे मुक्काम
दि. 17 जून सकाळी पळसखेड, ता. केज, जि. बीड येथून प्रस्थान - रात्री विद्याभवन हायस्कूल, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे मुक्काम
दि. 18 जून सकाळी विद्याभवन हायस्कूल, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथून प्रस्थान - रात्री कण्हेरवाडी, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे मुक्काम
दि. 19 जून सकाळी कन्हेरवाडी, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथून प्रस्थान - रात्री पाथरी, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर येथे मुक्काम
दि. 20 जून सकाळी पाथरी, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर येथून प्रस्थान - रात्री उत्तरेश्वर मंदिर, बार्शी येथे मुक्काम
दि.21 जून सकाळी उत्तरेश्वर मंदिर, बार्शी येथून प्रस्थान - रात्री खंडेश्वर मंदिर, खांडवी येथे मुक्काम
दि. 22 जून सकाळी खंडेश्वर मंदिर, खांडवी येथून प्रस्थान - रात्री जगदंबा मंदिर, माढा, जिल्हा सोलापूर येथे मुक्काम
दि. 23 जून सकाळी जगदंबा मंदिर, माढा, जिल्हा सोलापूर येथून प्रस्थान - रात्री शेटफळ, ता. मोहोड, जि. सोलापूर येथे मुक्काम
दि. 24 जून सकाळी शेटफळ, ता. मोहोड, जि. सोलापूर येथून प्रस्थान - रात्री श्री. रेणुका विद्यालय, बाभूळगाव, सोलापूर येथे मुक्काम
दि. 25 जून सकाळी श्री.रेणुका विद्यालय, बाभूळगाव, सोलापूर येथून प्रस्थान, त्यानंतर श्री क्षेत्र पंढरपूर येथे आगमन
दि. 29 जून (आषाढी एकादशी ) पर्यंत पंढरपूर येथेच मुक्कामी राहून कीर्तन तसेच इतर धार्मिक कार्यक्रमात सहभाग