एक्स्प्लोर

Ratnagiri News : रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का, लांजा नगरपंचायत उपनगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव 13 विरुद्ध 0 मतांनी मंजूर

Ratnagiri News : रत्नागिरीतल्या लांजा नगरपंचायतीमध्ये ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधातला अविश्वास ठराव शिंदे गटाने 13 विरुद्ध शून्य असा जिंकला आहे.

Ratnagiri News : कोकणात शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाकरे गटाला (Thackeray Group) धक्का दिला आहे. कारण रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातल्या लांजा नगरपंचायतीमध्ये (Lanja Nagar Panchayat) ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधातला अविश्वास ठराव (Motion of No Confidence) शिंदे गटाने 13 विरुद्ध शून्य असा जिंकला आहे. अविश्वास ठराव मंजूर होताच ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 10 एप्रिल रोजी मांडलेल्या या ठरावावर आज (17 एप्रिल) मतदान झालं. 

अविश्वास ठराव 13 विरुद्ध 0 असा मंजूर

नगराध्यक्षांसह शहर विकास आघाडीतील 13 नगरसेवकांना गटनेता म्हणून पूर्वा मुळ्ये यांनी व्हिप बजावला होता. दरम्यान या अविश्वास ठरावावेळी शिंदे गटाचे पाच, काँग्रेसचे दोन, अपक्ष दोन आणि भाजपचे तीन नगरसेवकांसह नगराध्यक्षांनी मतदान केले. त्यामुळे हा अविश्वास दर्शक ठराव 13 विरुद्ध 0 मतांनी मंजूर झाला झाला. 

अविश्वास ठरावाआधी 12 नगरसेवक अज्ञातस्थळी

लांजा नगरपंचायतीमध्ये आज उपनगराध्यक्ष पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याच्या आधी शिंदे गटासह 12 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले होते. अविश्वास ठरावादरम्यान होणारी संभाव्य पळवापळवी, फाटाफूट या गोष्टी टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. 

आमदार राजन साळवी यांना धक्का

दरम्यान, पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधात मंजूर झालेला अविश्वास ठराव हा स्थानिक आमदार राजन साळवी यांना देखील धक्का मानला जात आहे. शिवाय, आगामी काळात स्थानिक पातळीवरील गणितं देखील बदलू शकतात. याचे पडसाद नगरपंचायतीच्या राजकारणात दिसू शकतात.  सध्या या ठिकाणी राजन साळवी (Rajan Salvi) आमदार आहेत. शिवाय, विनायक राऊत (Vinayak Raut) खासदार आहेत. आमदार म्हणून राजन साळवी यांनी पकड मजबूत मानली जाते. त्यामुळे अविश्वास ठराव ठाकरे गटाच्या विरोधात जाणं हा राजन साळवी यांना धक्का आहे.

स्थानिक पातळीवर फोडाफोडीचं राजकारण

या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरची फोडाफोडी आणि कटशाहचे राजकारण पाहायला मिळालं. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी येथील सभेत ठाकरे गटाच्या लांजा नगरपंचायतीतील नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. याकामी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे मोठे बंधू किंग मेकर म्हणून ओळख असलेल्या किरण सामंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) काँग्रेसच्या नगरसेवकांच्या साथीने शिंदे गटाने ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget