एक्स्प्लोर

Ratnagiri Refinery Survey: बारसूमधील आंदोलक आक्रमक, सर्वेक्षणच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अडवल्यानं वातावरण निवळलं

Ratnagiri Refinery Survey: बारसूमधील आंदोलक आक्रमक झाले आहेत. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळत आहे.

Ratnagiri Refinery Survey: रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri News) राजापूर तालुक्यातील (Rajapur Taluka) बारसूमध्ये (Barsu) वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. बारसू रिफायनरीला (Barsu Refinery) स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आजही आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. अशातच काही वेळापूर्वी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. अखेर आंदोलकांना पोलिसांनी अडवलं आणि वातावरण निवळलं. 

रिफायनरी विरोधातील आंदोलनावर सध्या विरोधक ठाम आहेत. आज या माती परीक्षणाला जोरदार विरोध होऊ शकतो. ही सर्व शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या कोकणातल्या माळारानावर एका बाजूला विरोधक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आमनेसामने उभे टाकल्याचा चित्र उभे राहिलं आहे. 

स्थानिकांना ठाकरे गटानं पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अर्ध्या तासापासून विनायक राऊत आणि त्यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आहेत.  

Ratnagiri Refinery Survey: बारसूमधील आंदोलक आक्रमक, सर्वेक्षणच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अडवल्यानं वातावरण निवळलं

खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात

बारसू इथे आंदोलकांच्या भेटीला जाणारे ठाकरे गटाचे रत्नागिरीतील  खासदार विनायक राऊत यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारसू इथे जाताना त्यांना खबरदारी म्हणून ताब्यात घेतलं. राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर राजन साळवी त्यांच्या भेटीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

प्रकल्पामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न : उदय सामंत

हा तणाव का निर्माण झालाय, याच्या खोलाशी जाणं गरजेचं आहे. विद्यमान खासदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री आहे. स्वत: पत्र देऊन एक्स्पोज झाल्याने काही करुन या प्रकल्पामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. लोकांची डोकी भडकावण्याचं काम सुरु आहे. बाहेरचे लोक आंदोलनात सहभागी झाली आहेत. आंदोलकांचं काहीही म्हणणं असलं तरी सरकार चर्चेसाठी तयार आहे, असंही उदय सामंत यांनी म्हटलं.

प्रशासनसोबतच्या बैठकीत काय झालं?

रिफायनरीला झालेल्या विरोधानंतर रिफायनरी विरोधक, समर्थक, प्रशासन आणि तज्ज्ञ मंडळी यांच्यात गुरुवारी (27 एप्रिल) जवळपास दोन तासापेक्षा देखील जास्त वेळ चर्चा झाली. राजापुरातील प्रांताधिकारी कार्यालयात एवढे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विकास, रोजगार, पर्यावरण, मासेमारी तसेच तांत्रिक मुद्द्यांसह अनेक गोष्टींवर यावेळी चर्चा करण्यात आली. काही वेळेला चर्चेदरम्यान किरकोळ वादाच्या घटना देखील घडल्या. पण पोलिसांनी वेळी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील सर्व गोष्टी टाळल्या. यावेळी दोन्ही बाजूने उपस्थित केल्या गेल्या प्रश्नांना तज्ञांनी देखील उत्तरं दिली. दरम्यान, चर्चेअंती दोन्ही बाजूचा विचार करता संमिश्र अशा प्रतिक्रिया आल्या. या चर्चेनंतर नेमकं फलित काय असा सवाल देखील काहींनी विचारला? मुख्य बाब म्हणजे यावेळी राजापूर तालुक्यातील केवळ बारसूच नव्हे तर यापूर्वी रद्द झालेल्या नाणार येथील 8500 एकर जमीन देखील रिफायनरीसाठी घ्यावी. जेणेकरुन जास्त क्षमतेची रिफायनरी कोकणात उभी राहील अशी मागणी देखील समर्थकांकडून करण्यात आली. चर्चाअंती जिल्हाधिकारी यांनी ' रिफायनरी झाली पाहिजे. पण असं असताना सर्वांशी सुसंवाद ठेवला जाईल. प्रत्येकाच्या संख्येचा निरसन केल्या जाईल, असं आश्वासन देखील दिलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget