कार दरीत कोसळून अपघात, माय लेकाचा मृत्यू, दोन दिवसानंतर लागला अपघाताचा शोध
रत्नागिरीमधील (Ratnagiri) कुंभार्ली घाटात (Kumbharli Ghat) स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
Ratnagiri Accident News : रत्नागिरीमधील (Ratnagiri) कुंभार्ली घाटात (Kumbharli Ghat) स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात माय लेकाचा मृत्यू झाला आहे. 2 दिवसानंतर या अपघाताचा शोध लागला आहे. पुण्याहून कुंभार्ली येथील गावी येत असताना रविवारी गाडी खोल दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. आज मोबाईल लोकेशनवर अपघात झाल्याचा शोध लागला आहे. अलोरे पोलिसांनी या अपघाताचा शोध लावला आहे.
रत्नागिरीच्या (Ratnagiri) कुंभार्ली घाटात अत्यंत भीषण अपघात घडली आहे. या अपघातात माय लेकाचा मृत्यू झाला आहे. कार दरीत कोसळल्यानं हा अपघात झाला आहे. दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर दोन दिवस याबाबतची माहिती मिळाली नव्हती, दोन दिवसानंत या अपघाताची माहिती मिळाली आहे. अलोरे पोलिसांनी या अपघाताचा शोध लावला आहे.
गेल्या 3 वर्षाच अपघाताचे प्रमाण वाढले
गेल्या काही काळापासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे. अशामध्ये समोर आलेली आकडेवारी ही धक्कादायक आहे. गेल्या 3 वर्षांत म्हणजेच 2022 ते 2024 या कालावधीत राज्यात एकूण 95,150 रस्ते अपघात झाले आहेत. यामध्ये सुमारे 41,612 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्य परिवहन विभागाने (RTO) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 45 युनिटच्या माध्यमातून आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये मृत्यूचे प्रमाण हे साधारण 43.73 टक्के आहे.
मुंबई आणि उपनगरीय क्षेत्रात 4,935 रस्ते अपघात
गेल्या 3 वर्षांत रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले असून सुरक्षिततेबाबत अनेक सवाल उपस्थिती करण्यात येत आहेत. मुंबईमधील आकडेवारी पाहिली तर, 2024मध्ये मुंबई आणि उपनगरीय क्षेत्रात 4,935 रस्ते अपघात झाले आहेत. यामधील 2319 रस्ते अपघातांची नोंद ही फक्त मुंबईत झाली आहे. मुंबईकरांसाठी ही आकडेवारी धक्कादायक आहे. तर, मुंबई महानगर प्रदेशात झालेल्या अपघातांमध्ये 1,108 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या कालावधीत राज्यामध्ये तब्बल 32,801 रस्ते अपघातांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातांमध्ये 13, 823 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या आकडेवारीमधून राज्यातील 64 टक्के मृत्यू हे दुचाकीवर स्वार असणाऱ्या मागे बसलेल्या लोकांचेच होतात, असे निदर्शनास आले. तसेच त्यापैकी 80 टक्के प्रकरणात विना हेल्मेटचे असल्याचे समोर आले.
महत्वाच्या बातम्या:
Accident : बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत बसमध्ये आग भडकली; तब्बल 41 जण जिवंत जळाले, मृतांची ओळख पटेना























